Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : विद्यार्थ्यांसाठी बस नसल्याने भाजपाचा रास्ता रोको; सिंदखेडराजाहुन बस नसल्याने विद्यार्थीही आक्रमक

Buldhana News : मागील अनेक दिवसापासून प्रवाशी व विद्यार्थ्यांना बसची वाट पाहावी लागत आहे. सर्व बस बाहेरील तालुक्यातून येत आहेत. स्थानिक सिंदखेडराजा येथून एकही बस सुटत नाही

संजय जाधव

बुलढाणा :  सिंदखेडराजा येथील बस स्थानकमध्ये हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी व प्रवासी यांना बससाठी तात्कळत बसावे लागते. इतकेच नाही तर एक देखील बस वेळेवर नसते. त्यामुळे विद्यार्थ्यी व प्रवाश्याचे हाल होत असतात. वेळेवर बस सोडा, तसेच सिंदखेडराजा येथून बस सोडण्यात याव्यात या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मागील अनेक दिवसापासून (Buldhana News) प्रवाशी व विद्यार्थ्यांना बसची वाट पाहावी लागत आहे. सर्व बस बाहेरील तालुक्यातून येत आहेत. स्थानिक सिंदखेडराजा (Sindkhedraja) येथून एकही बस सुटत नाही. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रवाशांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. शाळा व महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना नाईलाजास्तव खाजगी गाड्याने प्रवास करावा लागतो. यामध्ये बराच वेळा विद्यार्थिनीना नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.  

सिंदखेडराजा येथील बस स्थानकावरून एकही बस जात नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या या समस्येवर एसटी महामंडळाने लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी (BJP) भाजपचे शहराध्यक्ष संदीप मेहेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना व प्रवाशांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT