Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: मेहकर टोल नाका केला कर्मचाऱ्यांनी बंद; दोन महिन्यापासून पगार नसल्याने संतप्त

Buldhana News : पहिले मेहकर फर्दापूर टोल नाका चालवण्यासाठी घेतला होता. यांनी कर्मचाऱ्यांचे पीएफ न देता कंपनी सोडून दिली व रोडवेज सोलुशन कंपनीला समृद्धी फरदापुर टोलनाका चालवण्यासाठी दिला

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: समृद्धी महामार्ग झाल्यानंतर या मार्गावर अनेक ठिकाणी टोल नका सुरु करण्यात आला आहे. यात मेहकर (Mehkar) येथील असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी काम  बंद आंदोलन सुरु केले आहे (Buldhana) मागील दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावरील मेहकर टोल नाक्यावरील दोन महिन्यापासून पगार नाही. दिवाळीत पगार होईल अशी अपेक्षा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना होती. परंतु रोडवेज कंपनीने पगार दिला नाही. याकरिता टोल नाका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज टोल नाका बंद केला आहे. सदर टोल नाक्यावरून जाणाऱ्या सर्व गाडी मालकांनी (Toll Plaza) टोलचा दांडा बाजूला करून टोल न भरता गाड्या टोल नाक्यातुन बाहेर जात आहेत. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप केले नाही. या पूर्वी फास्ट गो कंपनीने पहिले मेहकर फर्दापूर (Samruddhi Highway) टोल नाका चालवण्यासाठी घेतला होता. यांनी कर्मचाऱ्यांचे पीएफ न देता कंपनी सोडून दिली व रोडवेज सोलुशन कंपनीला समृद्धी फरदापुर टोलनाका चालवण्यासाठी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोडवेज सोल्युशन कंपनीने सुद्धा या मुलांचा पीएफ न देता दोन महिन्याचा पगार सुद्धा दिला नाही. जेव्हापासून टोलनाका सुरू झाला आहे. तेव्हापासून कर्मचाऱ्यांना पगार पत्र दिलेले नाही. पगार पत्र नसल्या कारनाने पीएफ सुद्धा मिळत नाही. दर तीन महिन्याला जर कंपनी बदलत राहीली, तर पीयफ कोणती कंपनी मुलांचे पगार पीयफ देणार असा सवाल उपस्थित होत आहे..

कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी 

गाड्यांसाठी टोल नका खुला करत यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यानी घोषणाबाजी करित टोल मोफत केला आहे. जोपर्यंत पगार व पीएफ मिळत नाही तोपर्यंत कर्मचारी टोल नाक्यावर आंदोलन करत सर्व वाहने फ्री सोडत राहणार अशी भूमिका घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT