Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : खामगाव- शिर्डी बसचा अपघात; दुभाजकाला धडकून पलटी, मोठा अनर्थ टळला

Buldhana News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर धरणगाव जवळील फौजी ढाब्या सामोर हा अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या खामगांव आगाराची बस खामगाव बसस्थानकावरून निघून शिर्डी कडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती

संजय जाधव

बुलढाणा : खामगाव वरून शिर्डीकडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला आहात. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुभाजकाला धडकून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील सहा प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर धरणगाव जवळील फौजी ढाब्या सामोर हा अपघात (Accident) झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या खामगांव आगाराची बस (Khamgaon) खामगाव बसस्थानकावरून निघून शिर्डी कडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. दरम्यान बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धरणगाव जवळील फौजी धाब्याजवळ अली असता बसचा अपघात (Bus Accident) झाला. समोरून येत असलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकाला धडकली. यात बस पलटी झाल्याची माहिती मलकापूर आगार प्रमुख मुकुंद न्हावकर यांनी दिली आहे.

अपघातात ६ प्रवासी जखमी

बस पलटी होऊन झालेल्या अपघातात बसमधील सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. बस पलटी झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT