Samruddhi Highway  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway News : समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ पुलावर ६ इंचाचा गॅप, मोठ्या अपघाताची शक्यता

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मेहकर टोल एक्सचेंजजवळ असलेल्या पैनगंगा नदीवरील पुलावर मोठा गॅप पडल्याचं समोर आलं आहे.

प्रविण वाकचौरे

संजय जाधव

Buldhana News :

समृद्धी महामार्गावरील अपघात हा चिंतेचा विषय आहे. महामार्ग सुरु झाल्यापासून याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत, ज्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.

मात्र महामार्गावरील काही गोष्टींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मेहकर टोल एक्सचेंजजवळ असलेल्या पैनगंगा नदीवरील पुलावर मोठा गॅप पडल्याचं समोर आलं आहे. यामुळे वाहनांचा टायर फुटून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

मेहकर टोल एक्सचेंजपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीवरील पूल आणि मुख्य मार्ग यामध्ये जवळपास सहा ते सात इंचाचा गॅप पडल्याने या ठिकाणी भरधाव वाहने जाताना मोठा आवाज होतो आहे. यामुळे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT