Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana: उपोषणकर्ताच झाला गायब; संतप्त ग्रामस्थांचा बीडीओंच्‍या दालनात ठिय्या

उपोषणकर्ताच झाला गायब; संतप्त ग्रामस्थांचा बीडीओंच्‍या दालनात ठियया

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील कवठल ग्रामपंचायतीत झालेल्या अनियमित कारभाराची चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई व्हावी; या मागणीसाठी १४ ऑगस्टच्या सकाळपासून पंचायत समिती कार्यलयासमोर (Buldhana) उपोषण सुरू केले होते. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर हे १५ ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक बेपत्ता झाल्याने गावातील संतप्त ग्रामस्थांनी आज संग्रामपूर (Sangrampur) गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या दिला आहे. (Buldhana Today News)

जिल्ह्यातील कवठलं गावातील सामाजिक कार्यकर्ते समाधान गाळकर हे गेल्या तीन दिवसांपासून गावातील ग्रामपंचायतच्या गैर कारभाराची चौकशी करून गैरकारभार करणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी पंचायत समिती संग्रामपूर कार्यालयासमोर आमरण उपोषणाची बसले होते. पण मध्यरात्रीपासून ते अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तामगाव पोलीसात तक्रार दिली आहे. दरम्यान ते बेपता होण्यामागे पंचायत समिती प्रशासन जवाबदार असल्याचा आरोप करत गावातील नागरिकांनी पंचायत समिती कार्यलयासमोर जमून निषेध केला आहे.

तणावाचे वातावरण

दरम्यान उपोषणकर्ता गायब कसा झाला. स्वतंत्र दिनी उपोषणाची दखल का घेतली गेली नाही? असे प्रश्न उपस्थित करत जमावाने या कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पंचायत समिती कार्यलयासमोर तणावाचे वातावरण आहे व परिसरातील विहिरीत व शिवारात नागरिक झाल्याने उपोषणकर्ता चा शोध घेत आहेत.

बीडीओंचा काढता पाय

ग्रामस्थ दालनात येताच गट विकास अधिकारी पसार झाल्याने ग्रामस्थ अजूनही संतप्त झाले. यामुळे बीडीओंच्या दालनातच घोषणाबाजी देत ठिय्या सुरू केला आहे. जोपर्यंत संतोष गाळकर यांचा शोध घेतला जात नाही तो पर्यंत आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT