Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: कमी उंचीवरून गेले हेलिकॉप्टर; कर्कश आवाजात बिथरल्‍याने बैल गंभीर जखमी

कमी उंचीवरून गेले हेलिकॉप्टर; कर्कश आवाजात बिथरल्‍याने बैल गंभीर जखमी

संजय जाधव

बुलढाणा : शेतात काम सुरू होते. याचवेळी आकाशातून दोन हेलिकॉप्‍टर गेले. हे हेलिकॉप्‍टर अतिशय कमी (Buldhana) उंचीवरून उडत असल्‍याने मोठ्याने आवाज येत होता. या आवाजात बैल बिथरले व सैरावैरा धावत सुटले. यामुळे बैल गंभीर जखमी होवून (Farmer) शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

शेगाव येथून जवळच असलेल्या डोलारखेड शिवारात रविवारी सायंकाळच्‍या सुमारास शेतकरी बैलांच्‍या सहाय्याने औत हाकत होता. शेतात काम सुरू असताना आकाशातून दोन हेलिकॉप्टर अतिशय कमी उंचीवरून गेले. या कर्कश आवाजामुळे शेतात काम करीत असलेले बैल घाबरल्याने सैरावैरा पळत सुटले. यात बैलाच्या पायाला लोखंडी यंत्र लागल्याने पाय कापल्या गेल्याने बैल कायमचा अपंग झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

भरपाईची मागणी

सध्या पेरणीचे दिवस असून शेतकऱ्याकडे नवीन बैल विकत घेण्यासाठी पैसे नाही. यामुळे पोलिसांनी या हेलिकॉप्टर मालकाचा व चालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या पुरुषोत्तम देठे नामक शेतकऱ्याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car battery life: कारची बॅटरी किती वर्ष चालते? जाणून घ्या कधी बदलावी?

Maharashtra News Live Update: बीड शहरातील जुना धानोरा रोड भागातील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

Ragi Recipe: नाचणीची फक्त भाकरी नाही, तर 'या' 5 सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Uddhav Thackeray: ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्या अन् तुरुंगात टाका, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

SCROLL FOR NEXT