Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मलकापूरत तिरंगा रथ यात्रेचे आयोजन

250 फुट लांबीचा तिरंगा रथ काढण्यात आला...

संजय जाधव

बुलढाणा - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समितीच्या वतीने जिल्हाभर तिरंगा जनजागरण रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मलकापूर (Malkapur) शहरातील प्रमुख मार्गाने तिरंगा जनजागरण रथाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातून चांडक विद्यालय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे विधीवत पूजन करून तिरंगा यात्रेचा प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गाने तिरंगा जनजागरण रथयात्रा 250 फुटाच्या तिरंगा झेंड्या सहित शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. हा 250 फुटाचा झेंडा या तिरंगा रथयात्रेचा विशेष आकर्षण ठरला होता.

हे देखील पाहा -

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक एडवोकेट अमोल अंधारे यांनी बोलताना सांगितले की, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असून या गौरवशाली पर्वा निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती च्यावतिने हर घर तिरंगा ध्वज उपक्रम राबविण्यात येत आहे.

तसेच जनजागरण करुन आपल्या तिरंगा ध्वजाचे कुठेही अवमान होणार नाही याची प्रत्येक भारतीय नागरिकाने दक्षता घेऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज राष्ट्र स्वाभीमानाने उभारून एकात्मतेचे दर्शन घडवावे. या करिता आपल्या मलकापूर शहरा मध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे ते बोलत होते.

या कार्यक्रमामध्ये सर्व माजी सैनिक यांना उपस्थित मातृशक्ति, ब्रह्माकुमारी भगिनी द्वारे राख्या बांधण्यात आल्या. तिरंगा रथ यात्रेमध्ये मध्ये अश्वस्वार भारत माता जीवत देखावा, बाल सैनिक जीवत देखावा, तसेच जनजागृति एलसीडी रथ होते.

जन जागृती तिरंगा रथ यात्रा चांडक विद्यालय मलकापूर येथून निघून शहरातील प्रमुख मार्गाने फिरत हुतात्मा संजयसिंह राजपूत स्मारक इथ पर्यंत रथयात्रा काढण्यात आली. शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकाला मानवंदना देऊन सामूहिक राष्ट्रगीताने तिरंगा जनजागरण रथयात्रेचे समारोप करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

SCROLL FOR NEXT