Gram Panchayat Result Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Result: विजयी- पराभूत गटामध्ये राडा; पराभव जिव्‍हारी आल्‍याने एकास मारहाण

विजयी- पराभूत गटामध्ये राडा; पराभव जिव्‍हारी आल्‍याने एकास मारहाण

संजय जाधव

बुलढाणा : ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार पडल्या असल्या तरी मतमोजणीनंतर मात्र राडा झाला आहे. (Buldhana) बुलढाण्यातील येळगाव ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat) निकाल जाहीर झाल्‍यानंतर विजय व पराभूत झालेल्‍या गटातील उमेदवारांमध्‍ये राडा झाला. यात पराभूत झालेल्‍या उमेदवारांकडून एकास (Crime) मारहाण झाली. (LIve Marathi News)

येळगांव येथील सरपंच पदाचा उमेदवार ९ मतांनी विजयी झालेले दादा लवकर यांच्या पॅनलमधील उमेदवार सचिन गडाखचे भाऊ पंजाबराव गडाख यांना पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना मतमोजणी कक्षाच्या बाहेर घडली. पोलिसांनी (Police) वेळेवर आपला हिसका दाखविल्याने जमाव पांगला. अन्यथा याच ठिकाणी दोन्ही गटामध्ये महाराडा झाला असता.

पराभव आला जिव्‍हारी

मतमोजणी होवून दादाराव लवकर यांना ९ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र विरोधी गटाने पुनर्मोजणीचा अर्ज केल्याने पुन्हा मतमोजणी झाली. परंतु पुनर्मोजणीनंतरही निकालात कुठलाही फरक पडला नाही. इकडे मात्र पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा राग अनावर झाला. विजयी सरपंच दादा लवकर यांचे समर्थक पंजाबराव गडाख यांना पराभूत उमेदवार अशोक गडाख यांच्या भाच्याने बँकेच्या चौकात गाडी थांबवून मारहाण केल्याची माहिती आहे. या मारहाणीनंतर दोन्ही गटामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. महाराडा होण्याच्या आधीच पोलिस पोहोचल्यामुळे गर्दी पांगली. दरम्यान पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी दादाराव लवकर आपल्या शेकडो समर्थकांसह पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT