Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: चार वर्षीय बालकाने गिळले २ रुपयांचे नाणे; थोडक्यात बचावला जीव

चार वर्षीय बालकाने गिळले २ रुपयांचे नाणे; थोडक्यात बचावला जीव

संजय जाधव

बुलढाणा : घरात खेळताना दोन रूपयाचा डॉलर सापडला. बालकाने तो तोंडात टाकल्‍यानंतर सरळ गिळला गेला. मात्र हे नाणे अन्‍न व श्‍वास नलिकेत अडकल्‍याने त्‍या मुलाला त्रास होवू लागला. मात्र डॉक्‍टरांनी (Doctor) शस्‍त्रक्रीया न करताच नाणे बाहेर काढून बालकाला जीवदान दिले. (Tajya Batmya)

शहजाद मेहबूब सुरतने (रा. आलेवाडी, ता. संग्रामपूर) असे सुखरूप असलेल्या बालकाचे नाव आहे. त्याने २ रुपयाचे नाणे गिळल्याने त्याला आज शेगांव येथील अग्रसेन चौक स्थित प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे आणण्यात आले होते. बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच वारंवार उलट्या होत होत्या. येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन सांगळे व त्यांच्या टीमने एक्स रे करून नाणे अडकल्याची जागा निश्चित केली. यानंतर कोणतीही शस्त्रक्रिया न करता फोलिज कॅथेटरच्या मदतीने 2 रुपयाचे नाणे बाहेर काढले.

अन्‍य डॉक्‍टरांनी दिला होता नकार

दोन रुपयांचे नाणे गिळलेल्या ४ वर्षांच्या मुलावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता फोलिज कॅथेटरच्या साह्याने त्याचे प्राण वाचवण्यात शेगावच्या डॉक्टरांना यश आले आहे. अन्न आणि श्वास नलिकेत अडकलेले नाणे काढण्यास अनेक खासगी रुग्णालयात नकार दिला होता. अखेरचा पर्याय म्हणून मुलास शेगाव येथील प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉ. सचिन सांगळे यांनी अर्ध्या तासाच्या आपली कसब लावून मुलास जीवनदान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सरकारचा जीआर कोर्टात टिकणार नाही - मराठा नेते प्रविण गायकवाड

Tharala Tar Mag : सायलीच्या आयुष्यात पुन्हा येणार 'प्रिया' नावाचे वादळ, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा VIDEO

Nepal Protest : नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १५० जण, उपमुख्यमंत्र्यांनी फोन करून दिला दिलासा

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार; आदिती तटकरेंची घोषणा

SCROLL FOR NEXT