बुलढाणा : बुलढाणा हे थंड हवेचे शहर म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच इंग्रजांनी बुलढाणा हे जिल्हा मुख्यालय केले होते. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेले नागरिकदेखील उन्हाळ्यातील काही महिने हिल स्टेशन बुलढाणा (Buldhana) येथे सुट्टी घालवत असतात. शहरालगत अजिंठा पर्वतरांगा असून ज्ञानगंगा अभयारण्याने संपूर्ण शहराला वेढा दिलेला आहे. त्यामुळेच या शहराचे आजपर्यंतचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जात होते. मात्र यावेळी एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा 42 अंशाच्या वर गेला आहे. शासकीय नोंदी नुसार 1981 पासून बुलढाणाचे तापमान पहिल्यांदाच 42 अंशाच्या वर गेले आहे. (buldhana news first time in its 43 year history the temperature rose to 42 degrees)
घराबाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कानाला रुमाल दिसतोय. अनेकांच्या डोळ्यांना सन गॉगल्स ही आहेत आणि यामुळे आपसूकच शीतपेयांचे प्रमाणही वाढले आहे. सपूंर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भात प्रामुख्याने अधिक तापमान पाहायला मिळते. त्यात बुलढाणा कमी असते. मात्र यंदा (Buldhana News) बुलढाण्यात 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान केवळ एप्रिल अखेर असून, अजून मे महिना बाकी असल्याने मे महिन्यात सूर्य किती आग ओकणार? याबाबत मात्र आता नागरिक चिंता व्यक्त करतायेत. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा र्हास कमी करण्यासंदर्भात जनतेनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताहेत.
बचाव करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
एकंदरीत जर का विचार केला तर बुलढाण्यात फ्लॉवर असलेला सूर्य यावेळी मात्र फायर करताना दिसून येत आहे. आणि किमान एक महिना तरी तो झुकणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाढत्या तापमानापासून आपला बचाव करावा, असे आवाहन प्रशासनासह डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.