Buldhana Dengue Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Dengue : बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यू पाय पसरतोय; ४१ जणांना लागण, चिकुनगुनियाचे १७ रुग्ण

Buldhana News : पावसाळा सुरु असल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. या साचलेल्या पावसाच्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन साथरोगाचा झपाट्याने फैलाव

संजय जाधव

बुलढाणा : पावसाळ्यात मच्छराचे प्रमाण वाढले असल्यामुळे तापाच्या रुग्णात भरमसाठ वाढ झाली आहे. यात जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत असून सध्या जिल्ह्यात ४१ रुग्ण आढळून आले आहेत. या सोबतच चिकणगुनियाचे देखील १७ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. असे असले तरी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. 

पावसाळा सुरु असल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. या साचलेल्या पावसाच्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन साथरोगाचा झपाट्याने फैलाव होत आहे. केवळ (Buldhana) बुलढाणा शहरच नव्हे तर जिल्ह्यात डेंग्यूने पाय पसरण्यास सुरवात केली आहे. सध्या जिल्ह्यात ४१ जणांना डेंग्यूची लागण झाली असून खाजगी रुग्णाल्यात डेंग्यू (Dengue) सदृश्यचे तीनशेच्यावर रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच चिकुनगुनियाचे रुग्ण देखील आढळूत येत असून सध्या १७ जणांना चिकुनगुनियाचा त्रास जाणवत आहे. 

आरोग्य विभागाकडून उपाय योजना नाही 

डेंग्यू व चिकुनगुनियाचा फैलाव होत असताना आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी ग्रामपंचायात असो किंवा शहरातील नगरपालिका यांनी यावर कुठल्याही उपाययोजना राबविल्या नाहीत. कुठेही फवारणी नसल्याने मछरांचे प्रमाण वाढले आहे. याकडे आरोग्य विभागाचेही पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा प्रशासणाने तातडीने संबधित विभागाना आदेश देऊन मच्छारावर नियंत्रण आणण्याचे मागणी नागरिक व ग्रामस्थ करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT