Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: फेसबुकवर मैत्री पडली महागात; वाढदिवस गिफ्टच्‍या नावाने फसवणूक

फेसबुकवर मैत्री पडली महागात; वाढदिवस गिफ्टच्‍या नावाने फसवणूक

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाण्यातील (Buldhana) महिलेला फेसबुकवर अनोळखी व्‍यक्‍तीशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्‍यक्‍तीशी चॅटींग करत असताना सदर महिलेची १३ लाख ३२ हजार रूपयात (Fraud) फसवणूक झाली आहे. (Tajya Batmya)

फेसबुकवर अनोळखी व्‍यक्‍तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही रिक्‍वेस्‍टला प्रतिसाद देवून मैत्री केली. फेसबुकवर मैत्रीत रूपांतरित केले आणि अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करत १३ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक (Cyber Crime) केली आहे. या मैत्री वाढदिवसानिमित्‍ताने महिलेला गिफ्ट पाठविले असल्‍याचे महिलेला सांगितले.

गिफ्ट सोडविण्यासाठी मागविली ऑनलाईन रक्‍कम

तुमच्या वाढदिवसाला गिफ्ट पाठवले असून ते अडकलेले आहे. सदर गिफ्ट सोडविण्यासाठी वेगवेगळ्या तारखेला ऑनलाइन रक्कम फिर्यादी महिलेकडून सांगितलेल्या बँक खात्यात टाकण्याचे सांगितले. अशा प्रकारे जवळपास तेरा लाख बत्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने बुलढाण्यातील सायबर पोलीसात तक्रार दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT