Buldhana News Court Judge Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: बलात्काराची खोटी तक्रार देणे महिलेला पडले महागात; कोर्टाने दिली दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा

बलात्काराची खोटी तक्रार देणे महिलेला पडले महागात; कोर्टाने दिली दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा

संजय जाधव

बुलढाणा : बलात्काराची खोटी तक्रार देऊन नंतर न्यायालयात आपला जवाब फिरविला. आरोपीने (Buldhana News) बलात्कार केलाच नाही, अशी भूमिका घेतल्याने व फितूर झाल्याने न्यायालयाने तक्रारदार महिलेलाच आरोपी करत दोन महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ई - फायलिंगद्वारे दाखल केलेल्या अशा प्रकारच्या हे पहिलंच प्रकरण आहे. (Live Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका २७ वर्षीय महिलेने अमडापूर पोलीस स्टेशनला तिच्या पतीच्या मित्रांने ती घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भादवी २७६ सारख्या बलात्काराचे कलम लावण्यात आले होते. पीडित महिलेचा न्याय दंडाधिकारी समोर जबाबही नोंदवला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

खोटी साक्ष दिली

परंतु पीडित फिर्यादी महिलेने न्यायालयामध्ये साक्ष देताना साक्ष फिरवली व तिच्यासोबत आरोपीने कोणतेही कृत्य केले नाही; असा खोटा पुरावा देऊन फितूर झाली होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले होते. मात्र न्यायालयाने निर्णय देतेवेळी फिर्यादी महिलेने जाणून बुजून न्यायालयात खोटी साक्ष दिल्याची बाबही समोर आणली. त्यामुळे या तक्रारदार महिलेवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 344 नुसार वेगळी कारवाई करण्याचे मत निकाल देतेवेळी न्यायालयाने नोंदवले होते. त्यामुळे माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी स्वतः ई- फायलींच्या माध्यमातून हे प्रकरण दाखल केले.

दोन महिन्‍याचा कारावास

फिर्यादी महिलेला आपली बाजू मांडण्याची संधी सुद्धा देण्यात आली होती. मात्र पीडित महिलेने आपले म्हणणे मांडले नसल्याने काल न्यायालयाने या महिलेला न्यायालयात जाणून बुजून खोटी साक्ष दिल्याबाबत दोषी धरत व यंत्रणेला कामाला लावल्याचा ठपका ठेवला. तसेच फौजदारी प्रक्रियेच्या सहितेनुसर कलम ३४४ नुसार दोन महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे ई - फायलिंगद्वारे दाखल केलेल असं हे पहिलंच प्रकरण आहे. त्यामुळे हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT