Buldhana Deulgaon Raja News  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: खळबळजनक! 'अपनी रानी किसी की दीवानी हो गई', स्टेटस ठेवत काँग्रेस शहराध्यक्षाची आत्महत्या

Deulgaon Raja News : गर्लफ्रेंडने धोका दिल्याने एका काँग्रेस शहराध्यक्षाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडने धोका दिल्याने एका काँग्रेस शहराध्यक्षाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 'अपनी रानी किसी की दीवानी हो गई', असं स्टेटस ठेवत या युवकाने आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

गजानन गुरव असं (वय २६ वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या काँग्रेस शहराध्यक्षाचं नाव आहे. गजानन हा देऊळगावराजा (Buldhana) तालुक्याती देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचा शहराध्यक्ष होता. गर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून गुरूवारी त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. दोघे बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र, अचानक या तरुणीने दुसऱ्या तरुणासोबत आपलं सूत जुळवलं. या नैराश्यातून (Crime News)  गजानन गुरव याने खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आपल्या प्रियसीने प्रेमात धोका दिला असल्याचं गजानन आपल्या व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्रामवर ठेवलं. त्यानंतर त्याने आपली जीवनयात्रा संपवली. इतकंच नाही तर गजानन याने आत्महत्येपूर्वी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा भावनिक मॅसेज पाठवल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT