Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : मविआचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या वॉर रूममधील कॉम्प्युटरसह साहित्य चोरी

Buldhana News : वॉर रूममधून मागील पंधरा दिवसांपासून काम सुरु होते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी देखील घरातच वॉर रूम सुरु केली होती

संजय जाधव

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी स्वतंत्र वॉर रूम उभारल्या होत्या. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या घरात असलेल्या वॉर रूममधील कॉम्प्युटर आणि इतर साहित्य चोरीला गेले आहे. 

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारांची तिकीट मिळविण्यासाठी धावपळ होती. पक्षाकडून तिकीट निश्चित झाल्यानंतर प्रचारासाठी बहुतांश उमेदवारांनी आपली स्वतंत्र वॉर रूम उभारली होती. या वॉर रूममधून मागील पंधरा दिवसांपासून काम सुरु होते. त्यानुसार (Buldhana News) बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी देखील घरातच वॉर रूम सुरु केली होती. याठिकाणी कॉम्पुटरसह प्रचारासाठी लागणारे सर्व साहित्य ठेवण्यात आलेले होते.  

दरम्यान विधानसभेसाठी आज मतदान होत असून प्रचार संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धार्थ खरात यांच्या वॉर रूममध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे. यात कॉम्पुटरसह काही साहित्य चोरीला गेले आहे. अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास (Crime News) चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान आपल्या घरावर ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात असल्याची माहिती काल सिद्धार्थ खरात यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवली होती आणि रात्रीचं या साहित्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात ‘नरेंद्र सरेंडर’ आंदोलन

Beed: बायोलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट, नातेवाईकांनी बांबूच्या सहाय्याने पुरवल्या कॉपी; VIDEO व्हायरल

Daily Wear Blouse Designs: रोज घालण्यासाठी 5 ब्लाऊज डिझाईन कोणते?

४० हून अधिक गुन्ह्यांतील फरार सराईत चोर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Bird Death Warning: मृत्यूचे संकेत देतात हे पक्षी; तुम्हालाही दिसत असतील तर व्हा सावध

SCROLL FOR NEXT