Chikhali Crime Saam tv
महाराष्ट्र

Chikhali Crime : चिखलीत दोन गटात राडा; शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून उफाडला वाद

Bhandara Chikhali News : ईद निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत चिखलीत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले होते. दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यावरून वाद निर्माण होऊन हाणामारी झाली

संजय जाधव

बुलढाणा : वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून रात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील बाबू लॉज चौकात दोन गटांत चांगलाच वाद उफाळून आला. या वादातून हाणामारी झाली. यावेळी त्याठिकाणी तणाव निर्माण झाला होता.  मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला. तर पोलिसाना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. ईद निमित्ताने चिखली शहरामध्ये दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवत रक्तदान देखील केले. मात्र एका गटाने दुसऱ्या गटातल्या युवकाला आमच्याकडे रक्तदान का केले नाही? असे म्हटले असता यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीपर्यंत पोहचले होते.  

पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाद मिटला 

रक्तदान शिवरावरून निर्माण झालेल्या वादामुळे दोन गट समोरासमोर भिडल्याचे पहायला मिळत असून बाबू लॉज चौकात चांगलाच राडा झाला आहे. मात्र हा वाद वाढण्यापूर्वीच ठाणेदार संग्राम पाटील यांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना दूर केले. यामध्ये पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला होता. सध्या परिसरात तणाव असून पोलिस बंदोबस्त लागला आहे. दरम्यान या संदर्भात अद्याप चिखली पोलिसात दोन्ही गटाकडून तक्रारा दाखल झाली नाही. 

लूटमार करणाऱ्यांची बाजारपेठेतून काढली धिंड
संगमनेर : संगमनेर शहरात कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी भर बाजारपेठेतून धिंड काढली आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील एका दुकानात घुसून आरोपींनी २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल लुटला होता. दुकानदाराच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. पोलिसांनी काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळत संगमनेर शहरातून आरोपींची धिंड काढली. पोलिसांच्या या कृतीने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Pak : 3842 दिवसांची अजिंक्य घोडदौड! भारतानं हॉकीचं मैदान मारलं, पाकिस्तानला लोळवलं; वर्ल्डकपच्या टॉप ८ मध्ये दणक्यात एन्ट्री

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडकींचा आकडा 92 लाखांवर; 4.5 लाख सरकारी लाडकींवर गुन्हा कधी?

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT