MLA Sanjay Gaikwad  saam tv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं; CM फडणवीसांच्या तंबीनंतर गायकवाडांविरुद्धात गुन्हा दाखल

MLA Sanjay Gaikwad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होणार आहे. त्याआधी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापलं होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडच्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार मेळाव्या आधीच ही कारवाई करण्यात आलीय.

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. BNS 296, 352 व पोलीस अधिनियम 1922 चे कलम 3 (पोलिसांबद्दल अप्रितीची भावना चेतविने ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना तंबी दिली होती. वारंवार असं बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना कडक शब्दात समज द्यावी असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज संध्याकाळी आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशमध्ये तक्रार करण्यात आलीय.

एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसात भ्रष्ट्राचार असल्याचा आरोप केला होता. ‘महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाहीये. आमदार अर्जुन खोतकर आणि संजय गायकवाड यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली होती. त्याप्रकरणी बोलताना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गायकवाड यांनी पोलीस खात्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

SCROLL FOR NEXT