Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सिला ब्रेक; MSRDC ची कारवाई

Buldhana News : महामार्गावरून वापरणाऱ्या वाहन धारकांकडून टोल वसुली केली जाते. यासाठी एका एजन्सीला तोल वसुलीचे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिवसभरात होत असलेल्या टोल वसुलीची रक्कम देखील मोठी आहे.

संजय जाधव

बुलढाणा : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर ठिकठिकाणी टोल नाके लावण्यात आले आहेत. दरम्यान महामार्गावर टोल वसुलीची रक्कम मोठी असूनही टोल नाक्यांवर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाहन धारकांच्या होत्या. या तक्रारींची दाखल घेत एमएसआरडीसीने तोल वसुली करणाऱ्या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.    

नागपूर ते मुंबई असा नव्याने तयार अरण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) वाहनांची वर्दळ खूप आहे. दरम्यान या महामार्गावरून वापरणाऱ्या वाहन धारकांकडून टोल वसुली केली जाते. यासाठी एका एजन्सीला तोल वसुलीचे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिवसभरात होत असलेल्या टोल वसुलीची रक्कम देखील मोठी आहे. मात्र त्या तुलनेत सुविधा मिळत नाही. यामुळे टोल कलेक्शन करणाऱ्या या एजन्सी विरुद्ध अनेक तक्रारी एमएसआरडीसीकडे आल्या होत्या. या तक्रारीत टोल नाक्यावर (Toll Plaza) शौचालयाचा अभाव, तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा नसणे, कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर न मिळणे, टोल वसुली कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक या विषयी या तक्रारी होत्या. 

६९ नोटीसीनंतर कारवाई 

सदर तक्रारीच्या अनुषंगाने एमएसआरडीसीने टोल वसुली करणाऱ्या रोडवेज सोल्युशन्स या कंपनीला तब्बल ६९ नोटिस बजावल्या होत्या. मात्र त्यानंतरही सदर एजन्सीकडून सुधारणा करण्यात आली नाही. सुधारणा न झाल्याने एमएसआरडीसीने या कंपनीचा ठेकाच आता रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर मोठ्या रकमेचा टोल वसूल करूनही वाहनधारकांना सुविधा मिळत नसल्याची अद्यापही वाहनधारकांची ओरड कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT