Buldhana Chikhali News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: लग्नाच्या वरातीत गाणं वाजविण्यावरून दोन गटात वाद; २० जण अटकेत

लग्नाच्या वरातीत गाणं वाजविण्यावरून दोन गटात वाद; २० जण अटकेत

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील सैलानीनगर परिसरात एका (Marriage) लग्नाच्या वरातीत डीजेवर गाणं वाजवण्याच्या (Chikhali) कारणावरुन दोन गटात वाद झाला होता. यावेळी दोन्ही गटाकडून दगडफेक सुद्धा करण्यात आली. काही लोकांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचेही बोलले जात आहे. (Tajya Batmya)

चिखलीच्‍या सैलानीनगर परिसरात वाद झाला त्याठिकाणी पोलिसांचा (Police) कडक बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. तर चिखली पोलिसांनी याप्रकरणी ३० जणांवर दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहे. यातील आतापर्यंत २० आरोपींना अटक केली असून राहिलेले आरोपीना सुद्धा लवकर अटक करणार असल्याच पोलिसांनी सांगितले.

लाठीचार्जमध्‍ये १३ जखमी

दरम्यान पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला. यामध्ये १३ जण जखमी झाले असून दोन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT