Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; धावत्या रेल्वेतून उतरताना सैन्यातील अधिकाऱ्याचा अपघात

Buldhana News : लग्नाची खरेदी सुरु होती. दरम्यान ते खरेदी करण्यासाठी अमरावती येथे गेले होते. खरेदी आटोपल्यानंतर अमरावतीहून खामगाव येथे येण्यासाठी गरीब रथ एक्सप्रेसमध्ये बसले होते.

संजय जाधव

बुलढाणा : विवाहाची खरेदी करण्यासाठी जात असताना शेगाव रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरताना सैन्यातील एका लेफ्टनंट पदावर असलेल्या अधिकाऱ्याचा तोल गेल्याने रेल्वे ट्रॅक वर पडले. यामुळे सैन्यातील या अधिकाऱ्याचा एक पाय कापला गेल्याची घटना रात्री घडली आहे. 

पवन शर्मा असं या सैन्यातील अधिकाऱ्याचे नाव आहे. पवन शर्मा यांचा येत्या २४ डिसेम्बरला विवाह होता. यासाठी त्यांची लग्नाची खरेदी सुरु होती. दरम्यान ते खरेदी करण्यासाठी अमरावती येथे गेले होते. खरेदी आटोपल्यानंतर अमरावतीहून खामगाव येथे येण्यासाठी गरीब रथ एक्सप्रेसमध्ये बसले होते. एस्प्रेस गाडी शेगाव येथे आली असताना ते खाली उतरत होते. 

खरेदी करण्यासाठी पवन शर्मा हे अमरावतीहून परत खामगाव येथे येत असताना शेगाव रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या तयारीत होते, मात्र त्यांचा तोल जाऊन ते रेल्वे ट्रॅकवर पडले. त्यामुळे त्यांचा एक पाय पूर्णपणे कापला गेला. यानंतर जखमी अधिकाऱ्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सुदैवाने वाचले प्राण 

पवन शर्मा यांचा येत्या २४ तारखेला विवाह समारंभ आहे. यामुळे घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. अवघ्या पंधरा दिवसांवर लग्न सोहळा असताना ही घटना घडली आहे. मात्र सुदैवाने शर्मा यांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Vastu Tips : किचनमध्ये ‘या’ 5 वस्तूंचे डबे चुकूनही रिकामे ठेवू नका, मोठ्या संकटात याल

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! भरधाव कारनं दुचाकीला उडवलं; नवरा-बायको फुटबॉलसारखे उडाले, थरारक घटना CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: खासदार कल्याण काळे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Navel Oil Therapy: महिलांनी ३० दिवस नाभीत बदामाच्या तेलाचे २ थेंब सोडल्याने काय होते?

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिट आधीच सुरू! 'या' भागांत पुढील ४ दिवस परतीचा पाऊस, तर काही जिल्ह्यांत उन्हाचे चटके वाढणार

SCROLL FOR NEXT