Lonar Sarovar Saam tv
महाराष्ट्र

Lonar Sarovar : लोणार सरोवर परिसरात जाताय तर आधारकार्ड आवश्यक; अप्रिय घटना रोखण्यासाठी निर्णय

Budhana News : बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. दरम्यान या परिसरात घनदाट अभयारण्य सुद्धा आहे.

संजय जाधव

बुलढाणा : जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर परिसरात घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस, वनविभाग आणि भारतीय पुरातत्व विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे लोणार सरोवर परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. दरम्यान या परिसरात घनदाट अभयारण्य सुद्धा आहे. या अभयारण्यात पर्यटनाच्या नावाखाली अनेकदा अप्रिय घटना घडतात. गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यातील एका युवकाचा खून या अभयारण्यात झाला होता. त्यामुळे अशा अप्रिय घटना घडू नये; यासाठी यापुढे लोणार सरोवर परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आपले (Aadhar Card) आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. हा नियम येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी लागू राहणार आहे. 

प्रवेशद्वारावर होणार नोंदणी 

प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांना आधार कार्ड दाखवल्यावरच लोणार सरोवर परिसरात प्रवेश मिळणार आहे. आधार कार्डवरून पर्यटकाचे नाव आणि आधार क्रमांक याची नोंद झाल्याशिवाय या परिसरात प्रवेश मिळणार नाही. तसेच बिना आधार कार्ड जर कोणी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT