Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: जिल्ह्यातील ६५ नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या; सरकारी कर्मचारी संपाचा फटका

जिल्ह्यातील ६५ नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या; राज्यसंपाचा रुग्णांना फटका

साम टिव्ही ब्युरो

बुलढाणा : गेल्या तीन दिवसांपासून राज्यव्यापी संप सुरु असून या संपात सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात मुख्य आरोग्य कर्मचारी सहभागी झाले असल्याने जिल्हा सामान्य रुग्णाल्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. जिल्ह्यातील तीन दिवसात ६५ नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या असून या संपाचा फटका रुग्णांना बसला. आता हा संप कशी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Letest Marathi News)

जुनी पेंशन योजना या मागणी करता राज्‍य सरकारी कर्मचारी तीन दिवसांपासून संपावर आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागाचे कामाकाज ठप्प झाले आहेत. बुलढाणा जिल्‍ह्यातील अनेक कर्मचारी संपात सहभागी झाले असून संपातील कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ५ हजार ७४४ कर्मचारी, महसूल विभागाच्या ४६७ कर्मचाऱ्यांना नोटीसा पाठविल्या आहेत. यामध्‍ये ‘नो वर्क नो पेमेंट’चा असा उल्लेख आहे. मात्र संपातील कर्मचारी हे संपावर ठाम आहेत.

सोलापूरात ६० शस्त्रक्रिया रखडल्‍या

जुनी पेन्शन योजना या मागणी करता मागच्या तीन दिवसांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास ६० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. मात्र, आरोग्य कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्य सोलापूरकरांना बसत असल्याचे दाहक चित्र सध्या दिसून येत आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास 600 कर्मचारी या संपात सामिल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा- धावत्या एसटीची डिझेल टाकी रस्त्यावर; मेहकर आगाराचा भोंगळ कारभार उघड!

Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यवसायिकाचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Mumbai News : मुंबईत धक्कादायक प्रकार! बनावट पोलीस बनून खंडणी उकळली; असा सापडला जाळ्यात

गोळ्या-औषधं घ्यायची गरज नाही! दररोज एक ग्लास हळदीचे पाणी प्या; शरीराला मिळतील 5 आरोग्यदायी फायदे

Maharashtra Farm Loan Waiver 2026: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे काम पूर्ण केले नाही तर कर्जमाफी मिळणार नाही

SCROLL FOR NEXT