buldhana leader controversial statement Saam tv
महाराष्ट्र

महिला पतिव्रता दाखवण्यासाठी मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालते; माजी आमदाराची जीभ घसरली

buldhana leader controversial statement : एखादी महिला पतिव्रता दाखवण्यासाठी मोठं कुंकू अन् मोठे मंगळसूत्र घालते, असं वादग्रस्त वक्तव्य माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलं आहे.

संजय जाधव

बुलढाण्यात माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

माजी आमदार राहुल बोंद्रे यांची पक्षप्रवेशावर बोलताना जीभ खसरली

बोंद्रे यांच्या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता

बुलढाण्यातील काँग्रेसचे माजी आमदाराची जीभ घसरली आहे. पतिव्रता असल्याचे दाखवण्यासाठी महिला मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते, असं वादग्रस्त वक्तव्य माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलं आहे. चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आज शनिवारी पत्रकार परिषद घेतली . या पत्रकार परिषदेत काल बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या पक्ष प्रवेशावर उत्तर देताना तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहात का? या प्रश्नावर आपला स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली.

'जी कुणी महिला असते, जीला दाखवावं लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते, असे राहुल बोंद्रे म्हणाले. राहुल बोंद्रे यांच्या या महिलांबाबत केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाले?

राहुल बोंद्रे म्हणाले, 'देशभरात त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा, त्यानंतर पक्ष प्रवेश भाजपमध्ये करून घ्यायचा. हे हेतूपरस्पर केलं जात आहे. मी आधीच सांगितलं आहे की, वारंवार सांगायची गरज नाही. एखादी पतिव्रता महिला असेल, ती मोठे कुंकू आणि मोठे मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तसं करण्याची गरज नसते. देवीची यात्रा होती, यात्रेविषयी चर्चा झाली. यात्रेत झालेली भेट होती. याच्याविषयी काहीच नव्हतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT