Buldhana News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: बुलढाण्यात बर्निंग ट्रकचा थरार! रस्त्यावर धावत्या वाहनाने घेतला अचानक पेट

Buldhana Fire News: चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला घेऊन स्वतःचे प्राण वाचवले आहे. यात ट्रक जळून खाक झाला आहे.

Ruchika Jadhav

संजय जाधव

Buldhana:

बुलढाणा जिल्ह्यात एका चालत्या ट्रकने पेट घेतल्याने बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडी गावा नजिक चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आर्को ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक अकोलाकडे जात होता. अचानक या ट्रकमधील साहित्याला आग लागली आणि बघता बघता हा ट्रक आगीच्या भक्षस्थानी सापडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या ट्रकमधील साहित्याची मोठी वित्तहानी झाली आहे. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला घेऊन स्वतःचे प्राण वाचवले आहे. यात ट्रक जळून खाक झाला आहे.

काल राज्यात लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र बऱ्याच ठिकाणी आगीच्या घटना देखील घडल्या आहेत. भिवंडीत मीराकलमॉलसमोर मार्केट परिसरात चार दुकानांना रात्रीचा सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत चार दुकानं जळून खाक झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तोपर्यंत सर्व दुकानं जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचा नुकसान झाले आहेत.

आज सकाळी नाशिकच्या मेनरोड रेड क्रॉस सिग्नल परिसरात असलेल्या वर्धमान या कपड्याच्या शोरुमला देखील भीषण आग लागलीये. अग्निशमन दलाचे १० हून अधिक बंब घटनास्थळी दाखल झालेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. यात ३ हून अधिक दुकाने आगीचा भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT