महाराष्ट्र

Buldhana Fire: खामगाव शहराजवळील श्रीहरी लॉन्सला भीषण आग; सर्वत्र पसरल्या आगीच्या ज्वाळा

Khamgaon Srihari Lawn Fire: बुलढाण्यातील सर्वात मोठ्या मंगल कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. खामगाव जवळ असलेल्या श्रीहरी लॉन्सला आग लागलीय.

Bharat Jadhav

संजय जाधव , साम प्रतिनिधी

बुलढाण्यातील खामगाव शहराजवळील असलेल्या श्रीहरी लॉन्सला भीषण आग लागलीय. सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरल्या आहेत. या लॉनच्या शेजारी निवासी परिसर असल्याने भीतीचे वातावरण आहे. लॉन्समध्ये अनेक एलपीजी सिलिंडर असल्याने धोका वाढला हे. दरम्यान खामगाव , नांदुरा येथील अग्निशमन दल ,पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्रीहरी लॉन्स हे जिल्ह्यातील सर्वात मोठं मंगल कार्यालय आहे. आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग करमानक 6 वरील खामगाव शहराजवळ असलेल्या सुटाळा येथे श्रीहरी लॉन्स आहे. हे सर्वात मोठे लॉन्स मंगल कार्यालयाला अचानक भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून मात्र आगीने उग्र रूप धारण केले आहे. तसेच आग विझविण्यासाठी खामगाव नांदुरा शेगाव मलकापूर येथील अग्निशमन दलाच्या वाहनाना पाचरण केले आहे. काही अग्निशमन दलाचे वाहने घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न करीत आहे आता अकोला येथून अग्निशमन दलाचे वाहने बोलाविण्यात आल्याची माहिती आली आहे.

श्रीहरी लॉन्समध्ये १० ते १२ सिलेंडर असून या आगीमुळे स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे लॉन्स दाट वस्तीत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नगर प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थली पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही एवढी भयावह आग अद्यापपर्यंत कुठेही जिल्ह्यात लागली नसल्याचं नागरिक बोलत आहेत. या भीषण आगीला नियंत्रणात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ही आग इतकी भीषण आहे, की काही वेळात संपूर्ण लॉन्सला आपल्या विळख्यात घेतलंय. या आग्नितांडवमध्ये संपूर्ण लॉन्स जळून खा झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू

Summer Season Daily Wear Saree: उन्हाळ्याच्या डेली युजसाठी कोणत्या साड्या बेस्ट?

राजकारणात उलथापालथ होणार; भाजपची सुपरस्टार अभिनेत्याला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

Gudi Padwa 2026 : सणासुदीला घाईगडबडीत फक्त ५ मिनिटांत करा मेकअप, 'या' ३ स्टेप्समध्ये चेहरा दिसेल उजळ

इराणच्या हल्ल्यात इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा मृत्यू? त्या व्हिडिओनंतर जगभरात खळबळ; नेमकं काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT