Buldhana Crime News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News : जुन्या वैमनस्यातून एकाची भररस्त्यात हत्या; रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक

Buldhana News : जुना वाद असल्याच्या रागातून रात्रीच्या सुमारास रस्त्यावर गाठत तीन ते चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण करत तसेच शस्त्राने वार करत खून केला. मात्र पोलिसांनी रात्रीतून मारेकरीना ताब्यात घेतले

संजय जाधव

बुलढाणा : जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमावर धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना बुलढाण्याच्या सैलानी येथे घडली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणात तपास करत रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून बुलढाणा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बाब्या उर्फ शेख नफिज शेख हफिज याचा धारदार शस्त्राने वार केले. तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

रस्त्यावर गाठत चढविला हल्ला 

सैलानी येथील बरीबाबा दर्गा असलेल्या रस्त्यावर हल्लेखोरांनी बाब्यावर प्राणघातक हल्ला चढवला. अलेक्स इनोक जोसेफ ऊर्फ रोनी, शेख सलमान शेख अशपाक आणि सैयद वाजीद सैय्यद राजू ऊर्फ वाजीद टोपी (सर्व राहणार सैलानी) या तिघांनी मिळून धारदार शस्त्र तसेच लाकडी दांड्याने बाब्यावर हल्ला केला. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या बाबू हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

रात्रीत आरोपी ताब्यात 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी तात्काळ पथक तयार आरोपींचे मागे लावले. तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपींना जाफराबाद येथून अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी खुनाची कबुली दिली. मात्र या घटनेने सैलानी परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT