husband went to bathroom, the wife disappeared hotel shegaon taluka  Saam TV
महाराष्ट्र

Shegaon Wife Missing News: नवरा बाथरूममध्ये गेला अन् बायको गायब झाली; शेगावमध्ये नेमकं काय घडलं?

Buldhana Crime News: बायको अचानक गायब होताच, नवऱ्या मुलाच्या पायाखालची जमिनच सरकली. त्याने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

Satish Daud

Buldhana Marathi News: धुमधडाक्यात लग्न लागलं. नवरीला घेऊन नवरदेव घरी आला. दोन्हीकडील सत्यनारायणाची पूजा देखील झाली. आता बायकोला घेऊन कुठेतरी देवदर्शनासाठी जाऊ आणि सुखी संसाराला सुरूवात करू, असं नवरदेवाला वाटलं. ठरल्यानुसार दोघेही नवविवाहित देवदर्शनाला गेले. त्यांनी रुमही बुक केली. मात्र, नवरा मुलगा बाथरूममध्ये जाताच नवरी गायब झाली. (Breaking Marathi News)

बायको अचानक गायब होताच, नवऱ्या मुलाच्या पायाखालची जमिनच सरकली. त्याने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातून समोर आला आहे.

शेगाव (Buldhana News) येथे दर्शनाला आलेल्या तरुणाने बायको बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. तक्रारीवरून पोलीस गायब झालेल्या नवरीचा शोध घेत आहेत. शीतल मधुकर भोपळे असं बेपत्ता झालेल्या नवविवाहितेचं नाव आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव (Jalgaon) खान्देश येथील रहिवाशी (पती) सुभाष चौधरी या तरुणाचं लग्न २२ मे २०२३ यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील मोहा येथील रहिवाशी असलेल्या शीतल भोपळे या तरुणीसोबत झालं होतं. लग्नानंतर नवरदेव नवरीला घरी घेऊन आला. (Latest Marathi News)

चार दिवसातच दोघांकडे सत्यनारायनाची (Marriage) पूजा देखील पार पडली. पूजा झाल्यावर नवदाम्पत्य शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शनासाठी आले. महाराजांचे आशीर्वाद घेऊन संसाराला सुरुवात करू या उद्धेशाने संतनगरीत आल्यावर चौधरी याने खाजगी ‘गेस्ट हाऊस’ मध्ये खोली घेतली.

दरम्यान, सुभाष हा ‘फ्रेश’ होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. त्यावेळी शीतल ही रुममध्ये होती. मात्र बाहेर आल्यावर सुभाषला आपली सौभाग्यवती न दिसल्याने मानसिक धक्काच बसला. त्याने परिसरात तिचा शोध घेतला असता, ती कुठेही आढळून आली नाही. यानंतर सुभाषने थेट शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून बायको हरविल्याची तक्रार दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT