Buldhana Husband Fatally Assaults Wife Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News: पती संतापला...न्यायालयाबाहेर पत्नीवर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?

Husband Fatally Assaults Wife: बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा शहरात राहणाऱ्या कविता विष्णू खराबे यांच्यावर पतीने जीवघेणा हल्ला केला. कविता यांचे पतीसोबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदुरा शहरामध्ये ही घटना घडली. काही कारणावरून झालेला वाद पत्नीच्या जीवावर बेतला. संतप्त झालेल्या पतीने धारधार शस्त्राने पत्नीवर वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा शहरात राहणाऱ्या कविता विष्णू खराबे यांच्यावर पतीने जीवघेणा हल्ला केला. कविता यांचे पतीसोबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. त्यांचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. शनिवारी न्यायालयामध्ये सुनावणी होती. त्यावेळी कविता खराबे न्यायालयातून बाहेर पडल्या. त्यावेळी संतप्त झालेल्या पतीने कविता यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले.

पतीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात कविता खराबे गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कविता यांना तात्काळ नांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. या घटनेप्रकरणी नांदुरा पोलिसांनी विष्णू खराबे यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी विष्णू खराबेला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT