Buldhana Crime news Saam Tv News
महाराष्ट्र

"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

Buldhana Crime news: गेल्या आठवड्यात एका तरुणाला गाय चोरीच्या संशयावरून विवस्त्र करून मारहाण करण्यात आली, आणि आता अजून एका तरुणाला शेत वादातून मारहाण झाली आहे.

Bhagyashree Kamble

  • बुलढाणा जिल्ह्यात एका आठवड्यात दोन दलित अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत.

  • अजय सोनटक्के या तरुणावर शेत वादातून जात विचारून हल्ला करण्यात आला.

  • आधीच्या घटनेत एक दलित तरुण विवस्त्र करून मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे.

  • दोन्ही प्रकरणांत आरोपी फरार असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाण्यात चाललंय तरी काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण गुन्हेगारांच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे. गेल्याच आठवड्यात एका दलित तरूणाला गाय चोरीच्या संशयावरून नग्न करून मारहाण करण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. शेतातील वादातून एका दलित तरूणाला ३ ते ४ जणांनी मिळून मारहाण केली आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत.

अजय सोनटक्के असं दलित तरुणाचं नाव आहे. तो ट्रॅक्टरने इतरांच्या शेतात मशागतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो . यातूनच वाद होऊन खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे तीन ते चार जणांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. "तू दलित आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" अशी शिवीगाळ करत या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणानंतर तरूणानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी तरूणाच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी अद्याप फरार आहेत. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

दलित तरूणाला विविस्त्र करून मारहाण

काही दिवसांपूर्वी खामगावात एका दलित तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. गाय चोपरल्याच्या संशयावरून त्याला विवस्त्र करून मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. तसेच विवस्त्र करून त्यांचा गायींसोबत फोटो काढण्यात आला होता. या मारहाणीत दलित तरूणाचा एक डोळा निकामी झाला असून, नाकाचं हाड मोडलं आहे. या तरूणावर सध्या शासकीस रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT