Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime : वरातीत नाचण्यावरून वाद; दुसऱ्या दिवशी गावात जोरदार राडा, ६ जण गंभीर जखमी

Buldhana News : बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे बुधवारी लग्नाची वरात जालना जिल्ह्यातील गोद्री येथे गेली होती. या ठिकाणी वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून देऊळघाट येथील तरुणात वाद झाला होता

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा झाला. यामुळे दोन ते तीन ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या मारहाणीत भाजप युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे बुधवारी लग्नाची वरात जालना जिल्ह्यातील गोद्री येथे गेली होती. या ठिकाणी वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून देऊळघाट येथील तरुणात वाद झाला. त्या ठिकाणी काही लोकांनी वाद मिटवत शांत केले. मात्र याचा राग मनात धरून आज एका टोळक्याने गावातील धनगर वाड्यातील तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामुळे गावात दोन गट समोरासमोर आल्याचे पाहण्यास मिळाले. 

गावात केली दगडफेक 

दरम्यान या मारहाणीत भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. तसेच प्रचंड दगडफेक देखील करण्यात आली होती. तर देऊळघाटच्या बसस्थानकावर ऋषिकेश सुसर या तरुणाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. 

गावात पोलिसांचा फौजफाटा 

मारहाणीमध्ये नंदू लवंगे, गणेश सुसर, सोपान लवंगे, शिवाजी सुसर, ऋषिकेश सुसर आणि रावसाहेब जाधव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे हे फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. तसेच अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींचे जबाब नोंदवले असून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

SCROLL FOR NEXT