Congress leader Vijay Ambhore has joined Shinde group  Saam Tv News
महाराष्ट्र

Vijay Ambhore : ठाकरेनंतर काँग्रेसला 'जोर का झटका', बड्या नेत्याचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश

Vijay Ambhore Joins Shivsena Party : विजय अंभोरे यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा तथा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Prashant Patil

बुलढाणा : कोकणात शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. बरेच दिग्गज नेतेमंडळी पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. याचाच अर्थ असा होतो की, महाविकास आघाडीमध्ये काहीस आलबेल दिसत नाहीय. याचदरम्यान, मविआमधील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. आज काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे मुंबईत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात मुंबईतील मलबार हील येथे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विजय अंभोरे यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा तथा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर आज ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेस पक्षासाठी बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर लगेच विजय अंभोरे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT