Chikhali News Saam tv
महाराष्ट्र

Chikhali News : कापड दुकानच्या गोडाऊनला भीषण आग; १५ लाखाचे कपडे जळून खाक

कापड दुकानच्या गोडाऊनला भिषण आग; १५ लाखाचे कपडे जळून खाक

संजय जाधव

बुलढाणा : कापड दुकानाचे गोडाऊनला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत (Fire) कापडाच्या गाठींचा कोळसा झाला असून साधारण (Buldhana) यात सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Breaking Marathi News)

चिखली शहरातील भव्य कपड्यांचे दालन आहे. या कपड्यांचे दालन असलेल्या दहिगांववाला यांचे गोडावून शहरातीलच शिंदे हॉस्पीटलच्या खाली असून त्याठीकाणी काही दिवसांपूर्वीच येणाऱ्या सणासुदीच्या निमीत्तने मोठया प्रमाणात माल भरुन ठेवण्यात आला होता. त्या गोडावून आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत १५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अग्निशामक बंब दाखल 
आगीचे वृत्त समजातच ठाणेदार संग्राम पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले. यावेळी नागरिकांनी आसपास असलेल्या दवाखान्यातील अग्नीरोधक यंत्र वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून नगरपालिकेचे अग्नीशमन यंत्रना देखील घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती

भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

Mumbai Pune Trains: पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! सलग ७ दिवस 'या' ३० गाड्या धावणार नाहीत; रेल्वेने सांगितलं मोठं कारण

SCROLL FOR NEXT