बुलढाणा : मधमाश्यांनी शेतमजुरांवर केला भीषण हल्ला; दोघे गंभीर जखमी! SaamTvNews
महाराष्ट्र

बुलढाणा : मधमाश्यांनी शेतमजुरांवर केला भीषण हल्ला; दोघे गंभीर जखमी!

शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे शेतात कांदा लावत असताना मधमाशांनी अचानकपणे मजुरांवर हल्ला केला.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे शेतात कांदा लावत असताना मधमाशांनी (Honey Bee) अचानकपणे मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींना खामगाव (Khamgaon) उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना अकोला (Akola) येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.

हे देखील पहा :

शेगाव (Shegaon) तालुक्यातील पहुरजिरा येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास कौशल्याबाई किसन पाघृत वय 55 हे शेतात कांदा लावत असताना मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तर, त्यांना वाचवण्यास मुरलीधर शालिग्राम पाघृत (वय 42) हे गेले असता त्यांच्यावर सुद्धा मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. शेतातील लोकांनी त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठवले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT