Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : भरधाव कारचा टायर फुटला, विरुद्ध दिशेला जात दुचाकीला धडक; पिता- पुत्राचा मृत्यू

Buldhana News : भरधाव वेगात असणाऱ्या कारचे टायर फुटल्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले. यांनतर कार विरुद्ध दिशेला येऊन डिव्हायडरला जोरात धडकून नांदुरा कडे जाणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकली

संजय जाधव

बुलढाणा : नांदुरा - बुऱ्हाणपूर मार्गावरील येरळी पुलावरील आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात भरधाव कार दुचाकीला धडकून हा अपघात झाला असून अपघातात दुचाकीवरील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातस्थळी येत वाहतूक सुरळीत केली. 

बुलढाणा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. यात नांदुरा कडून जळगाव जामोद येणाऱ्या भरधाव कारने नांदुराच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. येरळी नवीन पुलावर धडक दिली. भरधाव वेगात असणाऱ्या कारचे टायर फुटल्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले. यांनतर कार विरुद्ध दिशेला येऊन डिव्हायडरला जोरात धडकून नांदुरा कडे जाणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकली.

पिता पुत्राचा मृत्यू 

सदरच्या भीषण अपघातात पिता- पुत्राचा मृत्यू झाला आहे. कारने धडक दिल्यामुळे तिवडी येथील वडील राजू घाईट व मुलगा मंगेश घाईट हे गंभीररित्या जखमी झाले असता त्यांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच राजू घाईट यांचा मृत्यू झाला. तर मंगेश घाईट याला अकोला येथे पाठवण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.

डिव्हायडर वरून ट्रक पलटी होऊन तरुणाचा मृत्यू
भरधाव वेगात ताथवडे कडून डांगे चौक कडे जात असताना ब्रीज वरील डिव्हायडर वरून चालकाचे नियंत्रण सुटले. यात ट्रक पलटी होऊन रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारावर पडला. या घटनेत दुचाकी वाहनां वरुण जाणारा नितीन आटवे या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पिंपरी चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT