दर्शनाकरिता निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू...(पहा Video) संजय जाधव
महाराष्ट्र

दर्शनाकरिता निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू...(पहा Video)

दर्शनाकरिता निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: सोलापूर (Solapur) पाठोपाठ बुलढाण्यामध्ये (Buldhana) देखील दर्शनाकरिता निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा (Deulgaon Raja) गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. खामगाव जालना (Jalna) महामार्गावर बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली आहे. (Buldhana 5 killed in bolero car accident)

पहा व्हिडिओ-

यामध्ये शेगावला (Shegaon) देवदर्शनाकरिता जाणाऱ्या ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींवर देऊळगाव राजा आणि जालना येथील शासकीय रुग्णालयामध्ये (hospital) उपचार सुरू आहेत. आज पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. एकापाठोपाठ झालेल्या या भीषण अपघातांनी महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे.

सोलापूरमध्ये पंढरपूरला (Pandharpur) दर्शनाकरिता निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. तर बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. याबरोबरच परभणीच्या चारठाणा परिसरात एकाच दुचाकीवरुन ५ जणांना प्रवास करणे त्यांच्या चांगलंच जीवावर बेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT