Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: गॅसने भरलेल्या ट्रकची टपरीला धडक; मोठा अनर्थ टळला

गॅसने भरलेल्या ट्रकची टपरीला धडक; मोठा अनर्थ टळला

संजय जाधव

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव येथील फरशी परिसरात गॅस सिलेंडरने भरलेल्या एका ट्रकने फरशी परिसरातील पानटपरीला जोरदार धडक (Accident) दिली. या घटनेमुळे अनेकांच्‍या हृदयात धडकी भरली होती. (Live Marathi News)

बुलडाणा शहरातून जड वाहनांना प्रवेश बंदी असतांना देखील हा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक फरशी भागात शिरला होता. वेगाने जात असलेल्‍या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे हा ट्रक चक्क एका टपरीवर जाऊन आदळला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणत गॅसने भरलेले सिलेंडर होते. त्यामुळे मोठा स्फोट होऊन याठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती.

सुदैवाने जीवितहानी टळली

ट्रकने टपरीला धडक दिली. यावेळी सुदैवाने टपरीमध्ये कुणी नव्‍हते. यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक चालक हा पळून जाण्याच्‍या प्रयत्‍नात होता. मात्र स्थानिक नागरीकांनी चालकला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT