Beed Crime: नात्याला काळीमा! बीडमध्ये भावाचा बहिणीवर चाकू हल्ला विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Crime: नात्याला काळीमा! बीडमध्ये भावाचा बहिणीवर चाकू हल्ला

विधवा बहिनीच्या दुसऱ्या लग्नाला विरोध दर्शवत लग्नाच्या पूर्वसंध्येला भावाकडून क्रूर कृत्य

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विधवा बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला विरोध दर्शवत बहिणीसह होणाऱ्या नवऱ्यावर भावाने चाकू हल्ला (Attack) केला आहे. यामध्ये 25 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून हा संतापजनक प्रकार काल रात्री बीड (Beed) शहरातील डीपी रोडवर घडला आहे. (Brother stabs sister in Beed Crime police)

हे देखील पहा-

धनंजय दिपक बनसोडे रा. बीड (Beed) असे बहिणीच्या डोक्यात वार करणाऱ्या आरोपी भावाचे नाव आहे. हल्लेखोर धनंजय बनसोडेच्या बहिणीचे याअगोदर लग्न झालेले होते. मात्र तिच्या पतीचे मागच्या काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. तर आता ती बीड शहरातील योगेश बागडे या (वय- 28) वर्षीय तरुणाबरोबर, आज बीडच्या न्यायालयामध्ये (court) लग्न करणार होती. या दोघांच्या लग्नाला दोन्ही परिवाराची परवानगी देखील होती. तरी आज लग्न असल्यामुळे रात्री ती योगेश बागडेला आपल्या सोबत घेवून बीड शहरातील, सारडा कॅपीटलच्या परिसरात खरेदीला आली होती. रात्रीचा फायदा घेत भाऊ धनंजयने, आपल्या बहिणीच्या डोक्यात चाकूने सपासपा वार केले आहेत.

यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत असलेल्या योगेशवर देखील चाकूचे त्याने वार केले आहेत. या प्रकरणी बीड शहर पोलीस (Police) ठाण्यामध्ये आरोपी भाऊ धनंजय बनसोडे विरोधात, गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून (Police) त्याचा शोध घेण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकाराने भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासला असून बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

SCROLL FOR NEXT