google
महाराष्ट्र

Aurangabad: विहिरीत पडलेल्या वहिनीला वाचवताना दिराने जीव गमावला; सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला

विहिरीतून पाणी शेंदताना तोल जाऊन वहिणी विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी तरुणाने विहिरीत उडी घेतली. पण डोक्याला दगड लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

Dhanshri Shintre

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील लाखेगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. देश सेवेसाठी रुजू असलेला करण कच्छे हा जवान काही दिवस गावाकडे सुट्टीसाठी आला होता. गावा जवळील विहिरीतुन पाणी शेंदत असताना त्याची भावजयी विहिरीत कोसळी हे त्याला कळताच जवान करण विहिरीकडे धावला आणि विहिरीत उडी मारली. तेव्हा त्याला विहिरीतील काठावर असलेल्या दगडाचा डोक्याला जोरात मार लागल्याने मोठी गंभीर दुखापत झाली.

त्याने भावजयीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि वाचवलं सुद्धा मात्र वाचवत असताना पाण्यातील गाळामध्ये तो फसला आणि त्याचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कळताच परिसरातील सर्व नागरिक जमा झाले. महाराष्ट्र पोलीस औरंगाबाद ग्रामीणच्या वतीने सलामी देऊ राहत्या लाखेगाव या ठिकाणी जवान करण कच्चे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

Rain Flood : निसर्गाचं रौद्ररूप! मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत, ४४ नागरिकांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

SCROLL FOR NEXT