Dhule Gram Panchayat Election Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Gram Panchayat Election : आधी लगीन लोकशाहीचं मग माझं म्हणत नवरीने बजावला मतदानाचा हक्क

धुळ्यात एकूण 464 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भूषण अहिरे

धुळे - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना आज लग्नासाठी मुहूर्ताची तारीख असल्यामुळे आज बहुतांश ठिकाणी नवरदेव नवरी देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत. धुळ्यात (Dhule) देखील फागणे गावातील सीमा कुंभार या नवरीने आधी लगीन लोकशाहीचे आणि त्यानंतर स्वतःचे असं म्हणत लग्नाच्या मंडपात प्रवेश करण्यापूर्वी मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. या नवरीने आपला मतदानाचा (Voting) हक्क बजावला आहे. (Dhule Gram Panchayat Election)

आज राज्यातील विविध ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्याचबरोबर लग्नाचा देखील आज मुहूर्त असून लग्नापूर्वी आपलं कर्तव्य बजावत नवरी मुलगी लग्नाची लगबग सोडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी सकाळी मतदान केंद्रावर पोहचून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे.

जिल्ह्यातील एकूण 128 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली असून यातील दहा ग्रामपंचायती यापुर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित 118 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एकूण 464 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात धुळे तालुक्यातील 33, साक्री तालुक्यातील 55, शिंदखेडा तालुक्यातील 23 तर शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, 118 ग्रामपंचायतींच्या 417 प्रभागांसाठी एकूण 464 केंद्रांवर मतदान होत आहे, त्यासाठी 464 केंद्र प्रमुख, 1392 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर 464 शिपायांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

SCROLL FOR NEXT