Today Live Batmya in Marathi (15 March 2024) | Latest News on Mahayuti Mahavikas Aghadi Seat Sharing, Maharashtra Loksabha Election 2024, Bharat Jodo Nyay Yatra and Overall Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Today's Marathi News Live: मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका

Maharashtra Latest News and Update in Marathi (15 March 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.

प्रविण वाकचौरे

मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका

- मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका

- ⁠सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची दोन मोठी टेंडर केली रद्द

- ⁠या दोन्ही विभागाची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची टेंडर उच्च न्यायालयाने केली रद्द

- ⁠टेंडर बरोबरच शासनाने दिलेली आहे प्रशासकीय मान्यता देखील रद्द करण्यात आली आहे

- आरोग्य विभागाचे सहा हजार तीनशे कोटी रुपयांचे (६३००) आठ वर्षांसाठीचे

महाविकास आघाडीत काही जागांवरील तिढा अद्यापही कायम

त्या जागांबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे

त्यानंतर 17 मार्चनंतर पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन राज्यातील 48 जागांवर शिक्कामोर्तब केलं जाणार

ललित पाटील ड्रग्सप्रकरणी कोर्टात 3150 पानी चार्जशीट दाखल

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी कोर्टात चार्जशीट दाखल. पुणे पोलिसांनी केलं तब्बल 3150 पानांचे चार्जशीट दाखल. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे चार्जशीट पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केलं. ललित पाटीलसह त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, सुभाष मंडल, रौफ शेख,रेहान अन्सारी, अरविंद लोहारे, झीशान शेख, प्रज्ञा कांबळे, शिवाजी शिंदे, रोहितकुमार चौधरी आणि आमिर खान यांच्या विरोधात चार्जशीट मोक्का कोर्टात सादर.

सासवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतकरी मेळाव्याला सुरुवात

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी मेळाव्याळा सुरुवात. यावेळी कार्यकर्ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार. सासवडमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर जोरदार टीकेची तोफ डागली होती. यावर अजित पवार यांनी थेट बोलणे टाळले होते मात्र आज सासवड मध्ये अजित पवार हे शिवतारे यांना प्रतिउत्तर देतात का आणि त्यांच्या आक्रमक शैलीत शिवतारे यांनी उत्तर देतात का हे पाहव लागणार आहे

Pune News: पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली

राजेंद्र भोसले नवे आयुक्त.

विक्रमकुमार यांची एमएमआरडीएला बदली

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान सहयोग निवासस्थानी भेट.

भागवत कराड यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, भाजप पदाधिकारी दिलीप खैरे, अविनाश मोटे, मारुतराव वनवे, गोविंद देवकाते, आकाश कांबळे आदी पदाधिकारी..

सुनेत्रा पवार यांनी पुष्पगुच्छ देत केलं स्वागत..

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचीही उपस्थिती

रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत नाहीच, एकनाथ खडसेंची माहिती

खडसे विरुद्ध खडसे लढाई होणार नाही

मी प्रकृति कारणास्तव निवडणूक लढणार नाही

रोहिणी खडसेही उमेदवार नसणार आहेत

त्यांनी विधानसभा लढवली होती

आम्ही सात - आठ इच्छुकांची छाननी केलीय

त्यातून एक जण उमेदवार राहिल

राष्ट्रवादीकडे ही जागा आहे

Vasat More: वसंत मोरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

शिवसेना नेते संजय राऊत यांची वसंत मोरे यांनी घेतली मुंबईत भेट

३ दिवसांपूर्वी मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता

काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मोरे यांनी आज राऊत यांच्या भेटीला

भेट राजकीय नसून, लवकरच भूमिका जाहीर करेल अशी माहिती वसंत मोरे यांनी दिलीय

काँग्रेस प्रवक्ते आणि महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस संजय लाखे पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

आपल्या शेकडो समर्थकांसह मातोश्री निवासस्थानी जाऊन हाती शिवबंधन बांधले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला

यावेळेस 200 कार्यकर्ते उपस्थित होते

NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदार अपात्रतेसंदर्भात सहा आठवड्यांनी सुनावणी

विधान परिषदेच्या आमदारांची होणारी अपात्रतेच्या सुनावणी पुढे ढकलली

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोन्ही गटांना सहा आठवड्यानंतर वेळ दिली

आज कागदपत्र यांची देवाणघेवाण झाली असून पुढील सुनवणी सहा आठवड्यांनी होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमोल मिटकरी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील आमदार शशिकांत शिंदे, अरुण लाड, एकनाथ खडसे यांच्या विरोधात याचिका

शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे सतीश चव्हाण, बाबाजानी दुरानी, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात याचि

नांदेडमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघातात मृत्यू

नांदेड - नागपूर महामार्गावरील आसना पुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बाप - लेकाचा मृत्यु

अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील 40 वर्षीय गोपीनाथ गाढे हे आपले वडील दाजीबा गाढे यांना उपचारासाठी नांदेड येथील रूग्णालयात नेत होते

आसना पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, बाप - लेकाचा मृत्यू झाला

रासपचे महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला

रासपचे महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला

माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवार आणि जानकरांमध्ये वाय बी चव्हाण सेंटर येथे थोडयाच वेळात होणार चर्चा

महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला

तर महाविकास आघाडी जानकर यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीची संध्याकाळी चार वाजता बैठक होण्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची शरद पवार यांच्या सोबत भेट होत असल्याने बैठकीला मह

वसंत मोरे संजय राऊत यांची भेट घेणार आहेत

वसंत मोरे संजय राऊत यांची भेट घेणार आहेत

मुंबईत ही भेट होणार आहे

मनसेतून राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना केला होता फोन

पक्षप्रवेश नसून भेट घेण्यासाठी चाललो आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे

नवी दिल्ली : दोन्ही निवडणूक आयुक्तांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : दोन्ही निवडणूक आयुक्तांनी स्वीकारला पदभार

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन्ही नव्या आयुक्तांना दिल्या शुभेच्छा

Election Commissoner

चंद्रपुरातील तुकुम भागात भीषण आग

चंद्रपुरातील तुकुम भागात असलेल्या A to Z या बाजाराला सकाळी अचानक आग

दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे हे दुकान असून, यात बहुतांशी साहित्य हे प्लास्टिक स्वरूपातील आहे

दाट लोकवस्तीमध्ये हे दुकान असल्याने दोन घरेही यात जाळली

दोन सिलिंडरचा स्फोटही झाला,

सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली

आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.

भाजपचे महामंत्री मुरजी पटेल विरोधात गुन्हा दाखल

भाजप महामंत्री मुरजी पटेल विरोधात गुन्हा दाखल

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

शाहू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूरच्या विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आजपासून बंद,  केवळ मुखदर्शन घेता येणार

विठ्ठल मूर्ती संवर्धनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी व चांदी काढण्याच्या कामाची सुरूवात आज होत आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आजपासून बंद करण्यात आले आहे. पुढील 45 दिवस विठ्ठलाचे केवळ मुखदर्शन असणार आहे. पहाटे ५ वाजेपासून १०.४५ पर्यंत केवळ दिवसातून पाच तास विठ्ठलाचे भाविकांना दर्शन मिळेल. यासाठी आज पहाटेपासून विठ्ठल मंदिरात मुख दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

सातारा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी

सातारा लोकसभा मतदारसंघामधून भाजपा महायुतीची उमेदवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना द्यावी, अशी मागणी माथाडी कामगारांच्या बैठकीत करण्यात आली. एपीएमसी बाजारपेठेतील पाचही मार्केटचा नरेंद्र पाटील यांना पाठिंबा असून मागील लोकसभा निवडणुकीत चांगली मते नरेंद्र पाटील यांना मिळाली होती. भाजप महायुतीतर्फे उमेदवारी मिळाल्यास यंदा विजयी गुलाल उधळण्याचा विश्वास माथाडी कामगारांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी रचला होता कट

पुणे ISIS दहशतवाद मोड्युल प्रकरण

महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी रचला होता कट

दोन्ही राज्यात बॉम्बस्फोट घडवण्याच्या कट पुण्यात रचला गेला

पुण्यातील कोंढवा भागात राहत असलेल्या एका घरात बॉम्ब तयार करण्याचे दहशतवाद्यांनी घेतले होते प्रशिक्षण

मागील वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

NIA च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी केली होती अटक

NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतदादांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पूर्व आणि आरोपपत्र दाख

नाशिक महापालिकेची सिटी लिंक बस सेवा सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळीत

नाशिक महापालिकेची सिटी लिंक बस सेवा सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत

तपोवन बस डेपोतील सिटी लिंक बस कर्मचारी कालपासून संपावर

मागील दोन महिन्यांचं वेतन थकल्याने कर्मचारी आक्रमक

वेतन होईपर्यंत कामावर न येण्याचा संपकरी कर्मचाऱ्यांचा इशारा

मागच्या महिन्यात देखील कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी पुकारला होता संप

आंदोलनानंतर वेतन लवकरात लवकर देण्याचं कर्मचाऱ्यांना देण्यात आलं होतं आश्वासन

मात्र आश्वासन पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचं हत्यार

तर नाशिकरोड बस डेपोतील बस सेवा मात्र सुरळीत सुरू

बस सेवा विस्कळित झाल्यानं प्रवाशांना मात्र फटका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT