Breaking News Live Updates maharashtra latest updates Pm modi in solapur sharad pawar ram mandir  Saam TV
महाराष्ट्र

Breaking News Live Updates : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना नोटीस जारी

Maharashtra Breaking news : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

प्रविण वाकचौरे

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना नोटीस जारी

उद्या मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा आंतरवाली सराटी ते मुंबई असा निघणार आहे. हा मोर्चा बीड जिल्ह्यातील गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यातील गावांमधून जाणार आहे.. या मोर्चात सामील झाल्यानंतर आपल्यामुळे कोणालाही.. कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.. त्याचबरोबर धार्मिक जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. या नियम आणि अटीसह तब्बल 37 नियम नमूद केलेली नोटीस बीड पोलिसांकडून काही मराठा आंदोलकांना जारी करण्यात आली आहे.

पुणे मेट्रोच्या सुरक्षारक्षकाने वाचवले आई-मुलाचे प्राण

पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत 3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळताना रुळावर पडला. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर बटन वेळीच दाबले.

आरक्षणाबाबतचा निर्णय स्पष्टपणे बाहेर येऊ द्या : एकनाथ खडसे

गिरीश महाजन व मंत्र्यांनी जरांगेंना जे लिहून दिलं आहे त्याची अंमलबजावणी करावी ही जरांगे यांची मागणी आहे, मात्र आता तुम्ही लिहून दिलं तर पळ का काढता असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. ओबीसींना वगळून सगळे सोयऱ्यांसहित आरक्षण देणं शक्य नाही त्यामुळे सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकीकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊन असं सरकार सांगते तर दुसरीकडे ओबीसी मधून कुणब्यांना आम्ही आरक्षण देऊ असं सरकार म्हणते मात्र काय करायचं ते करा जो निर्णय आहे तो स्पष्टपणे बाहेर येऊ द्या, असं देखील ते म्हणाले आहेत.

वाघाच्या जबड्यात हात घालणारी लोकं दुष्काळी भागात जन्माला आली : शरद पवार

मंगळवेढा सांगोला आटपाडी, जत या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काळुंगे सर यांनी‌ काम केलं.

दु्ष्काळी भागातील लोक सन्मानाने जगण्यासाठी काय करतील नेम नाही

वाघाच्या जबड्यात हात घालणारी लोक दुष्काळी भागात जन्माला आली

अनेक लेखक देखील दु्ष्काळी भागात वाढले

साहित्याच्या क्षेत्रात चांगल काम केलं

अनेक नेते देखील याच मातीत जन्माला आले

या भागातच शिवाजी काळुंगे जन्माला आला.

इतिहासाला दृष्टी देणारा हा भाग आहे, असं शरद पवार म्हणाले

आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घरचा आहेर

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आज स्थानिक भाजपला घरचा आहेर दिला आहे. नवी मुंबईत सध्या प्रकल्पग्रस्त दी .बा पाटील यांच्या नावाने सध्या मोठं राजकारण केलं जात आहे. ज्या नेत्यांनी दी .बा पाटील यांना कधी नवी मुंबईत येऊ दिल नाही. आज तेच नेते त्यांच्या नावाने राजकारण करत आहेत. तर काही नगरसेवक त्यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या नावाने संघटना काढून प्रकल्पग्रस्तां ऐवजी स्वतःच कामांची कंत्राटं मिळवत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून समन्स

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात त्यांना गुरुवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

जनता अदालतनंतर शिंदे सरकारकडून क्रूरपणाची वागणूक : आदित्य ठाकरे

जनता अदालतनंतर शिंदे सरकार क्रूरपणे वागते आहे

लगेच सूरज चव्हाण यांना अटक झाली

मात्र त्यांच्या कंपनीचे मालक शिंदे गटात आहेत

राजन साळवी यांनी लढण्याची भूमिका घेतली आहे

त्यांनी काही चूक केली नाही, केली असती तर तुमच्या सोबत आले असते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भिवंडीतील पाणीपुरवठा योजनेचं नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन

भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शासनाने मंजूर केलेल्या 426 कोटी रुपयांच्या 100 एमएलटी पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत 2.0 मध्ये करण्यात आला आहे. दरम्यान या योजनेचं ऑनलाईन भूमीपूजन सोलापूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं.

मराठा समाजानंतर आता धनगर समाजाची चलो मुंबई ची हाक

मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईकडे निघाला असताना आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये 11 फेब्रुवारी रोजी इशारा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतरही सरकारने आरक्षणाविषयी निर्णय घेतला नाही, तर 17 फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या जन्मगावातून आरक्षण दिंडी मुंबईकडे काढण्यात येणार आहे. 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पोहोचून आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचा पदाधिकारी गुरुजी बनून करायचा फसवणूक

मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषि पांडे याला महिलेच्या फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या ऋषी पांडे याने गुरुजी बनून आपली ओळख आहे तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे

मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग नव्याने गठित केला आहे

फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे

सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन बाबत विंडो ओपन झाली आहे

आरक्षण देण्याबाबत एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे

सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठा, ओबीसी समाजाला आझाद मैदानावरील आंदोलनासाठी अद्याप परवानगी नाही

मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानावर अद्याप परवानगी नाही

20 जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाने पोलिसांची पत्र व्यवहार केलाय

मात्र आंदोनाला काहीच तास शिल्लक असतानाही आझाद मैदानावर पोलिसांकडून कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही

उद्यापासून सुरू होणारे आंदोलन 26 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात पोहोचेल

आझाद मैदान पोलिसांचा सावध पवित्रा ; निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती

नाशिक : सिन्नर तालुक्यातून मराठा बांधव अंतरवली सराटीकडे रवाना

नाशिक : सिन्नर तालुक्यातून मराठा बांधव अंतरवली सराटीकडे रवाना

शेकडो ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर रॅलीने अंतरवली सराटीकडे रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईतील आंदोलनासाठी मराठा बांधव अंतरवली सराटीला निघाले

उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे कूच करणार

चेंबूरमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने

चेंबूरमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने

रस्त्यावरील शाखेला ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते पोहोचले शाखेबाहेर, शिंदे गटाचा तीव्र विरोध

शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांचे कार्यकर्ते आमने सामने

प्रमोद शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत शाखेला लागलेलं टाळं उघडलं

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, परिसरात तणावाचं वातावरण

लातूर : शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखण्याचा केला प्रयत्न

लातूर : शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखण्याचा केला प्रयत्न

शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा लातूरच्या हरंगुळ रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन

सोयाबीन, ऊस, कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि निराधार यांच्या प्रश्नासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

रेल्वे स्थानकावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने घेतले ताब्यात

पालघर - वाढवण बंदर संदर्भातल्या जनसुनावणीच्या सभा मंडपाबाहेर स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी

पालघर - वाढवण बंदर संदर्भातल्या जनसुनावणीच्या सभा मंडपाबाहेर स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी

वाढवण बंदर रद्द करण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी

सुनावणीसाठी सरकारने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून लोक आणल्याचा स्थानिकांचा आरोप

बंदराचx समर्थन करण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यांमधून नागरिक बोलवल्याचही स्थानिक भूमिपुत्रांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या १५ हजार सदनिकांचा लोकार्पण सोहळा पार पडणार

एसटी बस-कांदा ट्रॅक्टरचा अपघात, ट्रॅक्टर पलटी होऊन कांद्याचे नुकसान

मनमाड-मालेगाव महामार्गावर मनमाडहून नंदूरबारकडे जात असलेल्या एसटी बस व कांद्याने भरलेल्या ट्रॅकरची जोरदार धडक

ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, तर बस चालक-वाहकासह काही प्रवाशी किरकोळ जखमी

अपघातामुळे रस्त्यावर सर्वत्र कांदा फेकला गेला

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले

मुंबई : प्रियकराचा प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला, स्वतःलाही केले जखमी

मुंबई मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला

या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे

प्रेयसीवर हल्ल्यानंतर प्रियकराने स्वतःवर देखील हल्ला करून जखमी करून घेतले

याप्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीनंतर करार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंढरपूर दौऱ्यावर

सोलापूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या १५ हजार सदनिकांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

रत्नागिरीत आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

रत्नागिरी- आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये बॅनरबाजी

रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवर उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

कितीही त्रास दिला तरी एकच पक्ष शिवसेना, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा, शूर आम्ही सरदार आम्हा काय कुणाची भीती अशा आशयाचे बॅनर

राजन साळवीन सोबत वाघाचे बॅनर वर पोस्टर

काल आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयावरती एसीबीने दाखल केला होता गुन्हा

अवैध संपत्ती संदर्भात केला होता गुन्हा दाखल

नागपूर : पतंग उडवण्याचा नादात कॅनॉलमध्ये पडून मुलगा बेपत्ता

नागपूर : पतंग उडवण्याचा नादात कॅनॉलमध्ये पडून मुलगा बेपत्ता

नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत महादूल परिसरातील कालव्यातील घटना

दयाशंकर प्रजापती असं बेपत्ता मुलाचं नाव

कोराडी पोलिसांकडून बुधवारपासून शोध सुरू , मुलगा नदी पात्रता वाहून गेल्याची शंका

शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे आज एकाच व्यासपीठावर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज मंगळवेढा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शिंदे यांच्या या गौप्यस्फोटावर शरद पवार काय बोलतात याकडेच लक्ष लागले आहे.

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूरजवळ अपघात

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूरजवळ अपघात

आयशर टेम्पोला मुंबई लेनवर झाला अपघात, दोघांचा मृत्यू

अनिल गावित आणि अनिकेत बोरासे अशी मृतांची नाव

अपघातानंतर एक्सप्रेस वेवर काहीकाळ वाहतुकीचा वेग मंदावला

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरला मानपाडा येथे अपघात

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरला मानपाडा येथे अपघात

चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती

अपघातानंतर कंटेनरने देखील पेट घेतला होता

कंटेनर बाजूला करण्यात आला आहे.

अपघातामुळे घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची विभागीय बैठक

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची विभागीय बैठक

२३ जानेवारीला काँग्रेस भवन येथे होणार विभागीय बैठक

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राहणार उपस्थित

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार बैठक

पुणे, सांगली, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा घेतला जाणार आढावा

त्यानंतर पुण्यातील काँग्रेस नेत्यांची डिनर डिप्लोमसी

पुणे शहरातील पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी

माजी आमदार आणि शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार स्नेहभोजनातून करणार नेत्यांची नाराजी दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नाशिक मतमोजणी केंद्रावर आरोग्य सेविका चिमुकल्या बाळाला घेऊन दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT