IT Raid Wagholi Saamtv
महाराष्ट्र

IT Raid: ब्रेकिंग! 'डबल महाराष्ट्र केसरी' पैलवानाच्या घरी आयकर विभागाचा छापा, भाजप नेत्याशी खास कनेक्शन

IT Raid Wagholi: अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे

IT Raid On Abhijit Katke House: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ⁠महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.

अभिजीत कटकेच्या घरी छापेमारी

राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार अमोल बालवडकर यांच्या सासऱ्यांच्या घरी म्हणजेच महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

बंडखोरीच्या तयारीत असलल्या भाजप नेत्याशी कनेक्शन!

अमोल बालवडकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. उमेदवारी न दिल्यास बंडखोरीच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले होते. अशातच आता त्यांच्या सासऱ्यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT