Constitution Temple News: Saamtv
महाराष्ट्र

Mumbai News: लोकसभेतील नरेटीव्ह खोडण्याचा भाजपचा प्रयत्न! सर्व ITI कॉलेजमध्ये उभारणार 'संविधानाचे मंदिर'; मंगल प्रभात लोढांची घोषणा

Constitution Temple News: कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा राज्यातील सर्व आयटीआयमध्ये भारतीय 'संविधानाचे मंदिर' तयार होणार असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे.

Gangappa Pujari

गणेश कवाडे, मुंबई|ता. ३ जुलै २०२४

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका संविधानविरोधी असल्याचे सांगत विरोधकांनी आवाज उठवला होता. ज्याचा मोठा फटका मोदी सरकारला बसल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेतील या अजेंड्याची धास्ती घेऊन भाजपने विधानसभेसाठी सावत्र पवित्रा घेतला असून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकांमधील संविधान बदलाचा नरेटीव्हचा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला. भाजपला संविधान बदलण्यासाठी ४०० पार जागा हव्या आहेत, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांच्या या दाव्यामुळे लोकसभेत पिछेहाट झाल्याने आगामी विधानसभेसाठी महायुतीने सावध पाऊले टाकायला सुरूवात केली आहे.

लोकसभेतील संविधान बदलाचा नरेटीव्ह खोडण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा राज्यातील सर्व आयटीआयमध्ये भारतीय 'संविधानाचे मंदिर' तयार होणार असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे.

'संविधान मंदिरा'ची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून आयटीआयमध्ये संविधानाच्या विचारांची शिकवण दिली जाणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी ही घोषणा केली होती. त्याचबरोबर गावागावात संविधानाचे विचार व महत्व पोहचवण्यासाठी उपक्रम राबवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT