Jayashri Munde Accident:  Saamtv
महाराष्ट्र

Accident News: मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची जोरदार धडक

Rajashri Munde Accident: या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्यात. कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रोहिदास गाडगे

Dhananjay Munde Wife Accident: पुणे सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्यात. कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर गुरुवारी (ता. १७ ऑक्टोबर) पहाटे हा अपघात झाला. पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे कार आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात जोरदार धडक होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्यात. धडक इतकी जोरदार होती की मुंडेंच्या लँड क्रूझर कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरुनही भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. समृद्धी महामार्गवर कारंजा तालुक्यातील वलाई गावाजवळ लोकेशन १८२ वर ही मोठी दुर्घटना घडली. यामध्ये कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

SCROLL FOR NEXT