Sushma Andhare Latest News Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: मोठी बातमी! ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Sushma Andhare News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Daud

Sushma Andhare Latest News

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मालेगाव तालुक्यात अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आपल्या शैलीत त्या विरोधकांवर टीकेचा भडीमार करीत असतात. काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. (Latest Marathi News)

या मुलाखतीत अंधारे यांनी हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी जाणून-बुजून हिन दर्जाचा शब्दप्रयोग करत हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या, असा आरोप मालेगाव येथील अमन परदेशी यांनी केला. यासंदर्भात परदेशी यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती.

दरम्यान, परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात भा.द.वि. कलम 295(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे शिवसेना उपनेते अद्वय हिरे जेलमध्ये असताना संजय राऊत यांच्यापाठोपाठ सुषमा अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, अंधारे आणि परदेशी यांच्यातील वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात भाषण करताना अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यासोबत नाशिकच्या अमन परदेशी यांचेही नाव घेतले होते. तेव्हा आपण अंधारे यांच्याविरोधात मानहानीचा दावा असं परदेशी यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT