Breaking : गणेशभक्तांवर विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १६ भाविक जखमी! संजय राठोड
महाराष्ट्र

Breaking : गणेशभक्तांवर विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १६ जण जखमी!

अचानक झालेल्या या हल्ल्याने भाविक घाबरून गेले आणि तिथून मिळेल त्या वाटेने धावू लागले. यातील १६ गणेश भक्त जबर जखमी झाल्याने त्यांना मारेगाव येथील दवाखान्यात आणण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळमधील मारेगाव येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या गणेशभक्तांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. अचानकपणे झालेल्या मधमाशांच्या या हल्ल्याने गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मधमाश्यांच्या या हल्ल्यात १६ गणेशभक्त जखमी झाले असून मधमाशांनी चावा घेतल्यामुळे त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

हे देखील पहा :

तालुक्यातील सालेभट्टी येथे गणेशभक्तांच्या घरी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली होती. आज गणेश विसर्जनासाठी नेहमीच्या ठिकाणी तलावावर न जाता गावातीलच बळीराम लोणसावळे यांच्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्यामध्ये गणपतींच्या विसर्जनासाठी हि मंडळी गेली. त्याच शेतामध्ये मोहाचे एक मोठे झाड आहे, आणि याच झाडावर आग्या मोहोळ बसलेले होते. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या कोणालाही याची पुसटशीही कल्पना नव्हती.

अशातच या मोहाच्या झाडावरील मोहोळ उठले आणि या मधमाशांनी सरळ गणेशभक्तांवर हल्ला चढवत कडकडून चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्याने भाविक घाबरून गेले आणि तिथून मिळेल त्या वाटेने धावू लागले. यातील १६ गणेश भक्त जबर जखमी झाल्याने त्यांना मारेगाव येथील दवाखान्यात आणण्यात आले. येथे उपचार करून झाल्यांनतर त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. थोडक्यात निभावल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT