Beed : भरधाव वेगातील स्विफ्ट कार बाभळीच्या झाडाला धडकली; 2 जण जागीच ठार! SaamTvNews
महाराष्ट्र

Beed : भरधाव वेगातील स्विफ्ट कार बाभळीच्या झाडाला धडकली; 2 जण जागीच ठार!

अपघात एवढा भीषण व ह्रदयद्रावक होता की, मयत व जखमींना JCB च्या साहाय्याने बाहेर काढावे लागले.

विनोद जिरे

बीड : परळीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची, बाभळीच्या झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात (Accident) 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी तेलगाव (Telgaon) येथे घडली आहे.

हे देखील पहा :

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भोकर (Bhokar) येथील तीन तरूण डिझायर गाडीने भोकर येथून बीडला जात असताना, तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या बाभळीच्या झाडाला स्विफ्ट डिझायर (Swift Dezire) गाडीची (क्रमांक MH-13 CK 0441) जोरात धडक बसून हा अपघात झाला.

या अपघातात सचिन भोसले, युसूफ शेख हे दोघे ठार झाले आहेत. तर अमोल वाघमारे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हा अपघात एवढा भिषण व ह्रदयद्रावक होता की, मयत व जखमींना तेलगाव येथील नागरिकांनी व पोलीस कर्मचारी यांनी जेसीबीच्या (JCB) साहाय्याने बाहेर काढले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT