Boycott  Saam Tv
महाराष्ट्र

दर्शन घेतले म्हणून संपूर्ण दलित समाजावर बहिष्कार; पुरोगामी महाराष्ट्रातील लाजीरवाणी घटना

यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस दलित समाजावर बहिष्कार टाकला. यात जर गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर त्यास मोठी आर्थिक दंड होणार असे सांगण्यात आले.

दीपक क्षीरसागर

लातूर - मंदिरात जाऊन एका दलित तरूणाने दर्शन घेतल्यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस दलित समाजावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात अश्या घटना घडत राहतात हे फार विदारक चित्र आहे. तब्बल तीन दिवसानंतर पोलिसांच्या (Police) मध्यस्थीने हे बहिष्काराचे (Boycott) प्रकरण मिटले आहे. मात्र यातून समाजात आजही जातिपातीच्या भिंती मिटता मिटत नसल्याचे चित्र उभे राहत आहे ते कसे मिटनारा हाच खरा प्रश्न आहे .

ताडमुगळी काही हजार लोकसंख्येचे गाव आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात हे गाव आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाच्या जवलील हे गाव तसे खुप शांत आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी गावातील प्रथा एका दलित समाजातील तरुण मुलाने मोडली आणि गावात तनावपूर्ण स्थिति निर्माण झाली.

हे देखील पहा -

तीन दिवसांपूर्वी एक तरुण गावातील मंदिरात गेला. देवाच्या पाया पड़त त्याने नारळ फोडले. दलित समाजाने मंदिराच्या बाहेरुन दर्शन घ्यावे ही रीत होती. हा शिरस्ता मोडला गेला आणि गावात दोन समाजात तेढ निर्माण झाली. यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस दलित समाजावर बहिष्कार टाकला. यात जर गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर त्यास मोठी आर्थिक दंड होणार असे सांगण्यात आले. दोन दिवसात याची चर्चा पोलिसांपर्यंत गेली. औराद शहाजानी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावात सर्वप्रथम पोलीस बंदोबस्त लावला त्यांनतर सर्वाशी चर्चा करत प्रकरण मिटवले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT