Yavatmal Crime News Saam tv
महाराष्ट्र

मुलगाच बापाला सोशल मीडियावरुन द्यायचा धमकी, त्यानंतर...

सोशल मीडियावर मुलगा आपल्याच बापाला धमकी द्यायचा मुलाचे बिंग पोलिसांनी फोडले.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ: यवतमाळ (Yavatmal) मधील आर्णी येथील व्यावसायिकासह त्यांच्या पुत्राला सोशल मीडियाद्वारे खंडणी मागून खुनाची धमकी देण्यात आल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या मुलाला बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी जायचे असल्याने खंडणी आणि धमकीचा बनाव सोशल मीडियाद्वारे (Social Media) रचला असल्याचे समोर आले आहे. यवतमाळ येथील सायबर सेलने केलेल्या तपासात व्यावसायिक पुत्राचाच धमकीमध्ये हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री नऊ वाजता व्यावसायिक हे जेवणानंतर लहान मुलासोबत घराबाहेर शतपावली करीत होते. यावेळी एक दुचाकीस्वार चालत्या वाहनावरून थुंकला. सदर थुंकी व्यावसायिकाच्या अंगावर उडाली. त्यामुळे हटकले असता दुचाकीस्वार पळून गेला. त्यानंतर ३ मे रोजी व्यावसायिक दुपारी घरी असताना त्यांना बहिणीने विनय टाके नामक व्यक्तीने तुझ्या श्रद्धाजंलीची पोस्ट फेसबुकवर टाकली असल्याचे सांगितले. त्यावर व्यावसायिकाने कुणी थट्टा करीत असेल, असे म्हणून दुर्लक्ष केले. मात्र ४ मे रोजी त्यांना सोशल मीडियावर मेसेज आला.

मुलाला मारण्याची धमकी

मुलाने परिधान केलेल्या कपड्यांचा उल्लेख करून तो क्लासमधून घरी निघाला असल्याचे सांगत १० मेपर्यंत मुलाचा गेम करण्याची धमकी दिली. तसेच ५ मे रोजी पुन्हा सोशल मीडियावर मेसेज करून कपड्यावर थुंकलो होतो, याची आठवण करून दिली. तू शिव्या दिल्याने त्याचा बदला मर्डर करून घेतो, असे म्हणून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. ६ मे रोजी अकाउंट बंद झाल्याने अन्य सोशल मीडियावरून मुलास जिवे मारण्याचे व खंडणीचे मेसेज सुरू झाले. त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले.

मुलानेच दिली बापाला मारण्याची धमकी

आर्णी पोलिसांनी (Police) घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण तांत्रिक बाबीशी संबंधित असल्याने पोलीस अधीक्षकांनी आर्णी पोलिसांसह यवतमाळ सायबर सेलला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. सायबर सेल पथकाने गुन्ह्यातील संपूर्ण तांत्रिक बाबीचे संकलन करून गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्यामध्ये व्यावसायिकाच्या मुलाने स्वत: वेगवेगळ्या नावाने विविध सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून गुन्हा केल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलीस(Police) अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वात आर्णी ठाणेदार पितांबर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, पीएसआय किशोर खंदार, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, पंकज गिरी, अजय निंबोळकर, सतिष सोनोने, रोशनी जोगळेकर, प्रवीण कुथे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT