Borghat Waterfall Saam Digital
महाराष्ट्र

Borghat Waterfall : ऐन उन्हाळ्यात धबधबे झाले प्रवाहित; मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना वेगळा अनुभव, पाहा Video

Maval Waterfall : गेल्या काही दिवसांपासून राज्याला वळवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. नदी-नाल्यांना पाणी आलं आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे मावळातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.

Sandeep Gawade

गेल्या काही दिवसांपासून राज्याला वळवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. नदी-नाल्यांना पाणी आलं आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ आणि लोणावळा भागातील धबधबे ऐन उन्हाळ्यात प्रवाहीत झाले आहेत. मावळात मेघगर्जनेसह वळवाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.अचानक आलेल्या पावसाने पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर लोणावळा बोरघाटात जागोजागी धबधबे प्रवाहित झाले आहेत.

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात, पिंपरी चिंवडसह संपूर्ण मावळात आज वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार अवकाळी पावसाने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र शेतातील उन्हाळी पिकासह जनावरांचा चारा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

मात्र गेल्या काह दिवसांपासून पडणाऱ्या वळवाच्या पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आलं आहे. जोराचा आणि सतत पाऊस पडत असेल तरच धबधबे प्रवाहित होतात आणि हे फक्त पावसाळ्यातचं शक्य आहे. मात्र आता पावसाळ्यासारखा फिल येत आहे. कारण गेले १५ दिवस राज्यात सतत अवकाळी पाऊस पडतोय.

दोन दिवसांपासून बदलापुरात जोरदार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीही असाच अवकाळी पाऊस बदलापुरात पडला होता. पंधरा ते वीस मिनिटांपासून सोसाट्याचा वारा सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीवर पावसाचं सावट आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या डोंबिवलीत होणाऱ्या सभेवर देखील पावसाचं सावट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavaricha Thecha Recipe: घरच्या घरी बनवा गावरान चवीचा झणझणीत गवारीचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

World Largest Parad Shivling: जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो पारद शिवलिंगाची हरिद्वारमध्ये प्राणप्रतिष्ठा...

नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढवतात 'हे' 4 पदार्थ; निरोगी हृदयासाठी कधीच खाऊ नका

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

SCROLL FOR NEXT